जागतिक महिला दिना निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजित

शेवगाव प्रतिनिधी, दि.०४ : सामाजिक कार्यात जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येथील खडोबा मैदानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित “कर्तुत्ववान महिलाचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव २०२४” शनिवारी (दि.२) रात्री हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.

खंडोबा मैदानावर अतिशय भव्य उभारलेल्या शामीयान्यात नेटक्या नियोजन पूर्वक आयोजित कार्यक्रमात ‘भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही ‘या थीम’ अंतर्गत महिला मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी सादर केलेल्या जून्या नव्या गाण्यातून आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली. अभिनेत्री अमृता खानविलकर, मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांवर भूरळ घातली.

कार्यक्रमाला प्रेक्षकांची अलोट गर्दी झाल्याने ऐन वेळी खुर्च्या मागविण्यात येऊन बैठक व्यवस्था वाढविण्यात आली. सर्वाची बसण्याची व्यवस्था होई पर्यंत खा. डॉ. विखे यांनी प्रेक्षका समवेत उभे राहून कार्यक्रम पाहिला. त्यानंतर त्यांनी मंचावर जाऊन कलाकारा समवेत ‘मै हूं डॉन’ या गाण्यावर ठेका धरून उपस्थितांचा आनंद दिगुणीत केला. 

हास्य वीर सुनिल पॉल, रोहित माने, शिवाजी परब यांनी आपल्या विनोदानी खळखळून हासविले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम केलेल्या न्यवरांचा गौरव करण्यात आला. कोरोना काळात अमूल्य योगदान देणाऱ्या तालुक्यातील फलकेवाडीच्या सरपंच डॉ. विजया फलके, कृषी खात्यातील अधिकारी या नात्याने शासनाचा विविध योजना शेतकऱ्या पर्यंत प्रभावी पणे पोहचविणाऱ्या सविता सानप बचत गटाच्या माध्यमानून महिलांना सक्षम करणाऱ्या कांबीच्या उषा होळकर,

झाडू कामगार म्हणून काम करत मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या पवित्रा कुसळकर शिक्षणा प्रती समाज जागृती करणाऱ्या शिक्षिका कमरूनिसा सालार शेख, समाज सेवेसाठी अग्रभागी असलेल्या जैन समाजाच्या शामा गांधी, एसटी वाहक म्हणून प्रामाणिक सेवा देणाऱ्या सुवर्णा देवकाते, महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना सक्षम बनण्यासाठी प्रयत्नशिल राहणाऱ्या रुपाली सरोदे, सुवर्णा टाकळकर, अश्विनी काकडे, पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या सिमा लाहोटी, आदि महिलांचा खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.