साडे चार वर्षात अखंड मतदार संघाचा विकास – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ :- कोपरगाव मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील गावांना विकासाच्या बाबतीत मागील पाच वर्षात सापत्नपणाची वागणूक मिळाल्यामुळे या गावांचा विकास खुंटला होता. मागील साडे चार वर्षात मतदार संघातील इतर गावांप्रमाणे या अकरा गावांच्या विकासाला चालना देवून अखंड मतदार संघाचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील न.पा.वाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रजिमा ८८ च्या न.पा.वाडी ते पुणतांबा रस्ता या रस्त्याचे ५.२० कोटी निधीतून भूमिपूजन, ग्रामपंचायत अंतर्गत १.३० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण,२५१५ अंतर्गत २५ लक्ष निधीतून करण्यात आलेल्या बाळकृष्ण वहाडणे घर ते भरत रहाणे घर डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण,

तीर्थक्षेत्र विकास निधीतून पुणतांबा येथील श्री क्षेत्र चांगदेव महाराज समाधी देवस्थानसाठी १ कोटी निधीतून सभामंडप व भाविकांसाठी शौचालय व स्नानगृहाच्या कामाचे भूमिपूजन, पुणतांबा येथे २ कोटी निधीतून पुणतांबा-रामपूरवाडी रस्त्याचे भूमिपूजन,२० लक्ष निधीतुन बाजार पेठेतील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने मला सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली त्या संधीचे सोने करून मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले व करीत आहे. त्या प्रयत्नांतून मतदार संघाच्या विकासासाठी २९०० कोटी निधी आणला. कोपरगाव मतदार संघाचा विकास करण्यासाठी मतदार संघातील जनतेने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून मिळालेल्या निधीतून समसमान वाटा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील ११ गावांना दिला आहे.

मी संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाचा विकास करणे हि माझी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मतदार संघातील सर्वच गावांना मागील साडे चार वर्षात विकासाच्या प्रवाहात आणले आहे. मात्र, हा झालेला विकास रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी मुलभूत विकासाच्या गरजा आहेत. या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात मागील साडे चार वर्ष जरी खर्ची पडले असले तरी यापुढील काळात खऱ्या अर्थाने मतदार संघाचा विकास होणार आहे. विकासाच्या बाबतीत आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा असून भविष्यात विकासाच्या बाबतीत मतदार संघात अमुलाग्र बदल करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, अॅड.मुरलीधर थोरात, मा.जी.प.धनंजय धनवटे, वाकडी ग्रा.सदस्य आण्णासाहेब कोते, न.पा.वाडीच्या सरपंच पल्लवी इल्हे, सदस्य वैशाली धनवटे, धनंजय उगले, मयूर वहाडणे, पुणतांबा ग्रा.प. सदस्य अक्षय सोमवंशी, शाम धनवटे, कांचन पेटकर, मंदा थोरात, भाऊसाहेब आहिरे, सोनाजी पगारे, दीपक वाघ, नंदू गायकवाड, रुपेश गायकवाड, राजेंद्र कुऱ्हाडे, अशोक काळे, सचिन वडणे, जगदीश वडणे, श्याम जगताप, विठ्ठल जाधव, शिवाजी जगताप,

अमर भोरकडे, रोहन काळे, रामराव जगताप, मिनिनाथ पाचरणे, मनोज गोरे, अविनाश लोंढे, किरण अभंग, भागवत शेळके, अमोल जाधव, सलीम शेख, बलराम बोंबले, डॉ.प्रदीप उगले, संजय घोडेकर, योगेश घोडेकर, राजेंद्र जगताप, दिनेश जगताप, सागर काळे, प्रथमेश शिंदे, संगम घोरपडे, सुरज दळवी, सत्यजित जगताप, प्रतीक लहारे, मच्छिंद्र शिंदे, बाबासाहेब ढोकणे, अविनाश लोंढे, किरण अभंग, शांतीलाल भाटी, रामकृष्ण चव्हाण, बबलू पऱ्हे, 

सोमनाथ लाहीरे, सोमनाथ खोसे, संदीप हासे, शिवा प्रधान, संजय धनवटे, शैलेश कुलकर्णी, भैय्या पिसे, प्रशांत कणसे, रुपेश बाबरे, रामभाऊ पवार, अशोक बोरबने, शकील शेख, सलमान तांबोळी, ऋषिकेश सोमवंशी, भूषण वाघ, ऋषिकेश सोनवणे अधिकारी सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक अभियंता रवींद्र चौधरी, ऋषिकेश राऊत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सह, अभियंता अमित चोळके आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.