दलबदलू उमेदवाराच्या शिर्डी मतदार संघात करेक्ट कार्यक्रम करणार – सविता विधाते

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गाला राखीव आहे. या मतदारसंघात सहा तालुक्यांचा समावेश होत असून येथील जी लोकसंख्या आहे ती एस सी समाजाची जास्त आहे. त्यातल्या त्यात बौद्ध धर्मीय मतदारांची संख्या जास्त आहे. परंतु कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने बौद्ध उमेदवार आज पर्यंत दिलेले नाही.

या मतदारसंघातून प्रथम भाऊसाहेब वाकचौरे आणि दोनदा सदाशिव लोखंडे हे खासदार झाले. पण निवडून आल्यानंतर परत त्यांनी कधी या मतदारसंघाकडे फिरकूनही पाहिले नाही. वाकचौरे इतर सर्वच पक्ष फिरून आले आहे. यावेळेस जर बौद्ध उमेदवार दिला नाही, तर अशा दल बदलू उमेदवाराचा या मतदारसंघातील बहुजन समाजातील मतदार करेक्ट कार्यक्रम करणार आहे. असे अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

या दोन्ही खासदारांनी बहुजन समाजातील लोकांचे तरुणींचे आणि महिलांचे प्रश्न सोडवलेले नाही. दोन्ही खासदारांनी केलेले उल्लेखनीय एखाद्या कार्य सांगावे असा प्रश्नही सविता विधाते यांनी त्यांना विचारला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व समाज विशेषतः मातंग बौद्ध आणि चर्मकार समाज जास्त नाराज आहे. मागासवर्गीय खासदार असून सुद्धा या समाजाला न्याय मिळालेला नाही. महाविकास आघाडीने जर बौद्ध समाज सोडून इतर उमेदवार दिला तर जो कोणी उमेदवार असेल त्याचा करेक्ट कार्यक्रम होईल असे त्यांनी सांगितले आहे.