मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नोंदवलेले गुन्हे मागे घ्या – सकल मराठा समाज

शेवगाव प्रतिनिधी, दि.९ :  शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटयासह तालुक्यात विविध ठिकाणी शांततेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनाकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यासंबंधी तालुक्यातील सकल मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर उमटला होता. या विषयावर गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंबंधी ठराव घेण्यात आले. लोकशाही मार्गाने शांततेत झालेल्या या आंदोलनामुळे कुठल्याही प्रकारची हानी अथवा अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी मुख्यमंत्री व राज्याच्या गृह मंत्र्याकडे करण्यात आली आहे.

शनिवारी शेवगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना देखील निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत.

यावेळी चंद्रकांत महाराज लबडे, रामजी शिदोरे, राजेंद्र आढाव, तुकाराम शिंगटे, अशोक देवढे, मच्छिंद्र आर्ले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता फुंदे, डॉ. दादासाहेब काकडे, अविनाश देशमुख, विठ्ठल प्रल्हाद आढाव, विठ्ठल रमेश आढाव, ज्ञानेश्वर फसले, डॉ.परवेज सय्यद, अॅड लक्ष्मण लांडे, अॅड आकाश लव्हाट, अॅड अतुल लबडे, अॅड बाबासाहेब अंधारे, सूहास चव्हाण, रावसाहेब मरकड, तारामती दिवटे आदि मान्यवर उपस्थित होते.