मतदार संघाच्या विकासाचे अचूक निदान – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ :- एम.आर.आय. मशीनद्वारे ज्याप्रमाणे शरीरातील आजारांचे योग्य निदान होवून औषधोपचार करून आजार बरा केला जातो. त्याप्रमाणे कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे योग्य निदान करून मतदार संघाचा विकास साधला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. कोपरगाव शहरातील साई सेवा एम. आर. आय. सेंटरचे उदघाटन सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.

Mypage

याप्रसंगी महानंदा दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कांतीशेठ अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, कोपरगावचे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. सचिन उंडे, निमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र रणदिवे, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, डॉ.दत्तात्रय मुळे, डॉ. अजय गर्जे, डॉ. संकेत मुळे, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. प्रीतम जपे, डॉ. योगेश कोठारी,

Mypage

डॉ. शिरीष मुळे, डॉ. संजय उंबरकर, डॉ. आप्पासाहेब आदिक, डॉ. विजय नरोडे, डॉक्टर मुरूमकर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. वैशाली आव्हाड, महात्मा गांधीच्या चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सतीश कृष्णानी, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राजेंद्र फुलपगर, वसंत आव्हाड, विजय बंब आदी मान्यवर उपस्थित होते.

Mypage

पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, वैश्विक कोरोना महामारीत मतदार संघातील सर्वच डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा देवून हजारो नागरिकांचे प्राण वाचविले. हि महामारी जरी आपल्यासाठी महासंकट होते. मात्र, या महामारीने मतदार संघाची आरोग्य सेवा किती तोकडी आहे हे आपल्याला दाखवून दिले.

Mypage

त्यामुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवून मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उभारणीवर व अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. त्या माध्यमातून माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले असून संवत्सर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची देखील निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात कोपरगावकरांना उपचार घेण्यासाठी कोपरगावच्या बाहेर जावे लागणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.    

Mypage