दर्शना पवारच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय द्या, कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव तालुक्याची कन्या कु. दर्शना पवार हिचा झालेला मृत्यू संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Mypage

कोपरगाव तालुक्याची रहिवासी असलेल्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. दर्शना पवार (वय २६) हिचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या कु.दर्शनाचा मृतदेह सापडला असून तिच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे दिसून येत आहे.

Mypage

तिच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मयत कु. दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने तिच्या मृत्यूची लवकरात लवकर सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असे दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Mypage

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा माजी नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, जिल्हा सचिव सौ.रेखा जगताप, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, माजी नगरसेविका सौ. माया खरे, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, मधुकर पवार, दिपक पवार, अनिकेत पवार, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, 

Mypage

धनंजय कहार,वाल्मिक लहिरे, विजय नागरे, शशिकांत देवकर, आकाश डागा, शुभम लासुरे, शैलेश साबळे, मनोज नरोडे, ऋषीकेश खैरनार, मुकुंद इंगळे, योगेश नरोडे, बाळासाहेब बारसे, सुमित मोरे, संदीप सावतडकर, अंबादास वडांगळे, राजेंद्र खैरनार, प्रमोद आभाळे, विकास बेंद्रे, जनार्दन शिंदे, राजेंद्र आभाळे, तेजस साबळे, महेश उदावंत, चंद्रकांत म्हस्के, शिवाजी लकारे, सोमेश शिंदे, शंकर घोडेराव, हारूण शेख, हर्षल जैस्वाल, अमोल आढाव, सौ.भाग्यश्री बोरुडे, कु.दीक्षा उनवणे, सौ. शितल लोंढे, सौ. भारती शिंपी, सौ. शितल वायखिंडे, सौ. रुपाली कळसकर आदींसह कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage