नवनिर्वाचित संचालक मंडळाचे उपुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : राहता तालुक्यातील श्री गणेश कारखाना निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडूकीत कोल्हे – थोरात युतिने विखे गटाला धूळ चारत १८-१ अशा मोठ्या फरकाने ही निवडणूक एकतर्फी विजय खेचून जिंकली आहे. त्या नंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले या प्रसंगी ना.चंद्रकांतदादा पाटील, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे आणि ज्यांच्या भोवती या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अशी महत्वाची भूमिका पार पाडणारे युवानेते विवेक कोल्हे हे उपस्थीत होते.
गणेश कारखाना नवनियुक्त संचालक मंडळ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट झाली असता सर्व संचालकांचे त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले. सहकारात काम करतांना पक्षविरहीत भूमिका ठेऊन भाजपा युती सरकार नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे पाठीशी असणार आहे. शेतकरी कष्टकरी यांची कामधेनु असणारा कारखाना टिकला पाहिजे या उदात्त हेतूेने झालेल्या या निवडुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कोल्हे – थोरात युतीने विखे यांच्या होम पीचवरच त्यांना पराभवाचा झटका दिला आहे. यामुळे ही निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्यभर गाजलेल्या या निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू असताना उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांचे केलेले कौतुक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
अनेक काळ संकटातून जाणारा कारखाना सभासदांच्या भावनेचा आदर ठेऊन जनमताचा कौल कोल्हे यांच्या बाजूने देणारा ठरला. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आगामी काळात श्री गणेश कारखाना जोमाने चालण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी पाठीशी असल्याचे सूतोवाच केल्याने राजकीय दृष्ट्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
या प्रसंगी गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, संपत हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, अरविंद फोपसे आदी उपस्थित होते.