बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस बुधवारी (२१ जून) विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथे वृक्षारोपण, मोफत सर्व रोगनिदान शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग, वैद्यकीय, कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी बिपीनदादांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीद्वारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय रोडवर सेवानिकेतन इंग्लिश स्कूल परिसरात बुधवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विविध झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोरोबानगरमध्ये मोफत सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पवार, डॉ. बत्रा, डॉ. शुभम गायकवाड, डॉ. सुजित सोनवणे, डॉ. भरत कुलथे, डॉ. स्वप्नील कासार आदींसह तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, विजय आढाव, जितेंद्र रणशूर, कैलास खैरे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, भाजपचे शहर सरचिटणीस जयेश बडवे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, रवींद्र रोहमारे,

गोपीनाथ गायकवाड, शिवाजी खांडेकर, सचिन सावंत, किरण सुपेकर, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, स्वराज सूर्यवंशी, सतीश निकम, वैभव सोनवणे, जयप्रकाश आव्हाड, गोरख देवडे, सुमित पाठक, भैय्या नागरे, प्रभुदास पाखरे, दत्तोबा जोर्वेकर, रहीमभाई शेख, प्रमोद नरोडे, संतोष साबळे, संतोष नेरे, रुपेश सिनगर, अल्ताफ पठाण आदींसह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, बिपीनदादा कोल्हे मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी नि:स्वार्थी भावनेने आयुष्यभर समाजसेवा केली. समाजकारण व राजकारण करताना विकासाला महत्त्व दिले. पाणी, शेती, सिंचन, सहकार, शैक्षणिक, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. सहकारी साखर कारखानदारी रुजवण्याचे व टिकवण्याचे काम आयुष्यभर केले. संजीवनी सहकारी साखर कारखान्याची व उद्योग समुहाची मुहूर्तमेढ रोवून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बिपीनदादा कोल्हे यांनी कष्टकरी शेतकरी, कामगार, गोरगरीब, वंचित, शोषित व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले.

अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ व इतर संकटाच्या काळात आपदग्रस्तांना मदत करून आधार देण्याचे काम त्यांनी केले व आजही हा समाजसेवेचा महायज्ञ अखंड सुरूच आहे. त्यांच्या अभ्यासू व दूरदर्शी नेतृत्वाखाली देशपातळीवर नावलौकिक मिळविलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची व संजीवनी उद्योग समुहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कोपरगाव तालुका अवर्षणप्रवण असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने मेहनत घेत पर्यावरण संतुलन राखण्याचे मोठे काम केले आहे. वृक्षारोपणाची चळवळ हाती घेऊन मागेल त्याला वृक्ष पुरवून त्याच्या जोपासनेसाठी नेहमीच मदत केलेली आहे.

स्वतःचा वाढदिवस दुसऱ्यांसाठी उपयुक्त ठरला पाहिजे या दृष्टिकोनातून ते वाढदिवसाला बडेजावपणा टाळून हारतुरे, सत्कार न स्वीकारता त्यावर होणाऱ्या खर्चातील रकमेत स्वतःची रक्कम घालून ग्रामीण भागातील मुला-मुलींना दरवर्षी लाखो वह्यांचे वाटप करतात. गरजूंना मदत करतात. जनसेवेची ही परंपरा यावर्षीही कायम राखत बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, सर्व रोगनिदान शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. बिपीनदादांच्या वाढदिवसानिमित्त अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल विविध मान्यवरांसह नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.