शेवगाव प्रिनिनिधी, दि. ११ : काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा इतिहास आहे. काँग्रेस पक्ष जेव्हा-जेव्हा संकटात सापडला तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकांच्या पाठिंब्यातून पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे मुसंडी मारून उभा राहिला आहे हा इतिहास आहे. त्यामुळे पुढील काळात काँग्रेस पक्ष एकजुटीने समर्थपणे उभा राहील असा आत्मविश्वास काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी येथे व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका काँग्रेसची आढावा बैठक नूतन जिल्हाध्यक्ष वाघ समन्वयक ज्ञानदेव वाफारे जिल्हा उपाध्यक्ष संपत म्हस्के शेवगावचे पक्ष निरीक्षक अभिजीत लुनिया, पाथर्डीचे निरीक्षक कार्लस साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पार पडली.
यावेळी जिल्हाध्यक्ष वाघ बोलत होते, तालुका अध्यक्ष समीर काझी यांनी स्वागत व प्रस्ताविक करून तालुका संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला जिल्हा चिटणीस सुधीर बाबर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश तुजारे, राजू काझी, शिवाजी हरवणे, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष बाशिद शेख, किसन धस, शामराव काळपुंड, बबलू वडघणे, दादासाहेब बनसोडे, समद काझी, कचरू मगर, नंदकुमार मोहिते, इमरान काझी, जगन्नाथ खंडागळे, यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.