कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या एक्साईड इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये कंपनीने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तब्बल ५२ नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली असुन हे सर्व अभियंते त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच कंपनीच्या सेवेत दाखल झाले आहेत.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अभियंत्यांना एका पाठोपाठ एक कंपनी प्राधान्य देत असुन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पालक व त्यांच्या पाल्यांचे नोकरीचे स्वप्न पुर्ण होत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, विविध प्रकारच्या बॅटरी बनविणाऱ्या एक्साईड कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या संकेत नवनाथ औताडे, संदिप बापू चव्हाण, साहिल सिध्दार्थ धाडीवाल, सचिन सुधाकर बनसोडे, सिध्दार्थ भिमाशंकर लोखंडे, कृष्णा ज्ञानेश्वर महानोर, सिध्दार्थ साहेबराव मेहरखांब, निलेश राजु म्हस्के, सिताराम माधव मोरे, ताहिर निसारअहमद पटेल, सुयोग भाऊसाहेब राऊत, अनिकेत दिपक साठे, ओमकार मधुकर साठे, साहिल धाडीवाल,
तन्मय विनोद वर्पे, यश अरविंद वाघ, यश मनोजकुमार जंगम, मेघशाम सुनिल दांगल, वैभव देविदास खैरनार, अभय रमेश गनगोडक, वेदांत संदिप बाकरे, अथर्व आशुतोष शुक्ला, सुजित शांताराम सागर, सचिन कारभारी थोरात, दिपक संपत वाघ, धिरज संजय भोसले, सार्थक आण्णासाहेब अव्हाड, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या राहुल शिवाजी आदे, तुषार सुरेश भारूड, प्रनिल चंद्रशेखर भास्कर, अभिषेक प्रकाश बोरणारे, प्रकाश बापुसाहेब धुमसे,
अक्षय तात्यासाहेब होन, प्रसाद चंद्रकांत जाधव, अनिकेत सिध्दार्थ जावळे, महेश भिमराज कानडे, करूण पागेत्रा, सुमित सिताराम खामकर, श्रेयश रविंद्र लहामगे, विशाल सुदाम लांडे, समाधान निवृत्ती न्याहरकर, कृष्णा भागचंद तांभोरे, विनोद गोरख येवले, अभिषेक शहदेव तांदळे, प्रविण गोरक्ष हाडके, ऋषिकेश वसंत अडलिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या मयुर गोकुळ बारहाते, अभिषेक राजेंद्र भुजबळ, दिपक विठ्ठल माने, ओमकार अनिल शिर्के , साईराम पोपट सोहके व आदित्य सुनिल पवार यांची निवड केली आहे.
एकाच वेळी एक्साईड कंपनीने संजीवनीच्या ५२ अभियत्यांची निवड करून कंपनीने संजीवनीवरील विश्वासहर्ता अधोरेखित केली आहे, तसेच संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज ऑटोनॉमस असल्याचे हे फलित आहे, असे श्री कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंते व त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पटारे, डॉ. डी. बी. परदेशी, डॉ. आर. ए. कापगते, डीन डॉ. व्ही. एम. तिडके यांचे अभिंनदन केले आहे.