कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद अहमदनगर तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. राधाकिसन देवढे साहेब व सहाय्यक सल्लागार मा. दिनकर नाठे साहेब जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद अहमदनगर (दिव्यांग विभाग) यांच्या मार्गदर्शनानुसार दि.14 रोजी संग्राम निवासी मुकबधीर विद्यालय, संगमनेर, अहमदनगर येथे दिव्यांग मतदार जनजागृती विषयी विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
दि.14 रोजी चित्रकला स्पर्धेतून दिव्यांग मतदान बाबत जागृती होईल अशा विषयावर विद्यार्थ्यांकडून चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिव्यांग मतदार जनजागृती केली व प्रत्यक्ष मतदान पद्धती समजावून देण्यात आली.
सकाळी संग्राम मूकबधिर विद्यालयातील मुकबधिर दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी यांच्या वतीने वेल्हाले परिसरामध्ये दिव्यांग मतदार जनजागृती निमित्त वेल्हाळे परिसरातील नागरिक व दिव्यांगांना तसेच घरो घरी तसेच दुकाने, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक विद्यालय, आंगणवाड़ी येथे जाऊन यावेळी मतदान नोंदणी व मतदान करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी या विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.