कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती सुधार योजनेंतर्गत कोपरगाव मतदार संघाच्या १९ गावातील विविध भागातील ३६ विकास कामांसाठी २ कोटी ०२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील अनेक जाती-जमातीचे नागरिक असून या समाजाच्या नागरिकांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून १९ गावातील वस्त्यांना विविध विकासकामांसाठी २.०२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये कोळपेवाडी येथील दत्तनगर (१० लक्ष) व गावठाण (०३ लक्ष) निधीतून सौर दीप बसविणे तसेच गावठाण मध्ये दोन ठिकाणी (०८ लक्ष) व (१० लक्ष) निधीतुन रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे,४, माहेगाव देशमुख येथे जाधव वस्ती (०३ लक्ष) व सहा चारी गावठाण (०७ लक्ष) निधीतून सौरदीप बसविणे, चांदगव्हाण येथे बाचकर नवीन वस्ती (१० लक्ष) सौर दीप बसविणे व (०३ लक्ष) निधी रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, काकडी तासकर वस्ती(०४ लक्ष) व कांदळकर वस्ती (१०लक्ष) सौरदीप बसविणे व येलमामे वस्ती(०६) लक्ष निधीतून रस्ता खडीकरण करणे, सुरेगाव हळनोर वस्ती (०५ लक्ष) रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे व मोतीनगर (०५ लक्ष) स्मशान भूमी रस्ता व गटार काम,
कारवाडी फटांगरे वस्त येथे (०५ लक्ष)अहिल्यादेवी मंदिर ते मोगरे वस्ती रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, चांदेकसारे येथे (०२ लक्ष)निधीतून दयानंद वाडीचा रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, घारी येथे (०६ लक्ष) निधीतून बिरोबा नगर वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे, वारी टिक्कल वस्ती येथे (०७) लक्ष निधीतून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, बाजार तळ येथील मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता (०५ लक्ष) निधीतून कॉन्क्रीटीकरण करणे व गटार करणे राहिंज वस्ती येथे १० लक्ष निधीतून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, सोनेवाडी येथे २९ नाला/ माळशिकारे खोमणे लांडबिले वस्ती रस्ता (५ लक्ष) कॉन्क्रीटीकरण करणे व माळी वस्ती (०२ लक्ष) व जायपात्रे वस्ती (०२लक्ष) रस्ता खडीकरण करणे,
सोनारी येथे ६ चारी नवीन वस्ती येथे (०३ लक्ष) रस्ता खडीकरण करणे, बक्तरपूर येथे जुने गावठाण (०४ लक्ष) व पाझर तलाव नवीन वस्ती (०५ लक्ष) रस्ता मजबुतीकरण करणे, सडे १, धामोरी वडार वस्ती जोड रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे (०४ लक्ष), लव्हाटे वस्ती येथे जोड रस्ता खडीकरण येणे (०४ लक्ष) व लव्हाटे कोळपे वस्ती येथे लव्हाटे वस्ती ते कोळपे वस्ती रस्ता खडीकरण येणे (०४ लक्ष), डाऊच खु. बढे वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (०४लक्ष), मोर्विस येथे गावठाण येथे समाजमंदिर बांधणे (१०लक्ष), भोजडे येथे गावठाण या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणे (०४ लक्ष), दहेगाव बोलका गावठाण (०५ लक्ष) मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता व गटार करणे, शिवाजीनगर या ठिकाणी (०७ लक्ष) निधीतून शौचालय व विद्युतीकरण करणे,
कोकमठाण येथे कोकमठाण माळवाडी येथे रस्ता खडीकरण व अंतर्गत गटार करणे (०५लक्ष),व कांचनवाडी येथे रस्ता खडीकरण व अंतर्गत गटार करणे (०५लक्ष) असा एकूण २ कोटी ०२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे. यापुढेही तांडा वस्तींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल यासाठी पाठपुरावा करून इतर विभागाच्या माध्यमातूनही भटके विमुक्तांसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.