शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील भायगाव येथील सुभद्राबाई हरिभाऊ लांडे यांचे शुक्रवारी (दि. १५) वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ९० वर्षाच्या होत्या. जुन्या पिढीतील व धार्मिक कुटुंबातील मनमिळाऊ स्वभावाच्या व शांत संयमी असणाऱ्या सुभद्राबाई ‘बाई ‘ या नावाने पंचक्रोशीत परीचित होत्या.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भायगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजी लांडे व शेवगावचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. लक्ष्मणराव लांडे यांच्या त्या मातोश्री होत.