जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपत भारूड हे आंबेडकरी समाजाचे भूषण – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपत भारूड आंबेडकरी समाजाचे भूषण असून वंचित घटकांच्या समस्या घेवुन त्याचा पाठपुरावा करण्यांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. 

तालुक्यातील संवत्सर भीमवाडी परिसरातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपत जमनराव भारूड यांना शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला तो त्यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या चरणी समर्पीत केला त्याप्रसंगी ते बोलत होते. 

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील समाज बांधवांच्या उन्नतीसाठी मोठे काम केले असुन तीच प्रेरणा घेत संपत भारूड सामाजिक जीवनांत कार्यरत आहेत, भीमवाडी पसिरात त्यांनी पाणीवापर संस्था स्थापन करून शेतक-यांच्या प्रशंांना प्राधान्य दिले आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मनिर्भर भारताच्या विकास प्रक्रीयेत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करत नव विकास गणनेची युवा पिढी घडविण्यासाठीही काम केले आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अल्पसंख्यांक दीन दलित समाजाच्या उत्कर्षावर भर दिला तोच धागा पकडून आपणही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यांने प्रयत्न करत आहोत असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी सभापती सुनिल देवकर, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ अध्यक्ष अंबादास देवकर, नानासाहेब रणशुर, कृषी अधिकारी कदम, रतन गायकवाड गुरूजी, विलास अहिरे, राजेंद्र रणशूर, राहुल रणशूर, बिपीन गायकवाड, यांच्यासह आंबेडकरी समाजाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.