चारा आणण्यासाठी गेलेला गोपाल घोडेराव बेपत्ता

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : घरातील जनावरांना चारा नसल्याने येवला येथील घास बाजारातुन घास (चारा) आणण्यासाठी बुधवार दि.१३ मार्च रोजी गोपाल संजय घोडेराव वय २९ वर्षे रा. आडगाव चोथवा ता. येवला जिल्हा नासिक येथील हा विवाहीत युवक दुपारी गेला होता. माञ, तो परत आलाच नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून येवला पोलीस स्टेशनचे पोलीस व गोपाल घोडेराव याचे नातेवाईक चहुबाजूंनी शोध घेत आहेत. घरी दोन लहान मुलं आपल्या पित्याची वाट पहात आहेत. घास आणण्यासाठी गेलेला युवक अचानक बेपत्ता झाल्याने येवला व कोपरगाव तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. 

दरम्यान गोपाल घोडेराव हा युवक पैठणी साड्यांचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्यांचे परराज्यासह अनेक ग्राहक व व्यावसायिकांशी संबंध असल्याने गोपाल घोडेरावच्या बेबत्ता होण्यावरून अनेक तर्क लढवले जात आहे. 

सदरील युवक कोणाला आढळल्यास येवला पोलीस स्टेशन व त्यांचे नातेवाईक यांच्याशी ९३२५३९७२२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.