शेवगाव मध्ये ठिकठिकाणी रूटमार्च काढण्यात आला

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ :  येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा. व येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी रूटमार्च काढण्यात आला.

सोमवारी रुटमार्चसाठी शेवगाव पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अधिकारी, वीस पोलीस अंमलदार, दहा होमगार्ड व बी.एस.एफ चे अधिकारी पोलीस निरीक्षक शैलेश मिश्रा व ४० अंमलदार हजर होते.

सकाळी अकराला बोधगाव, त्यानंतर दुपारी चापडगाव, तर दुपारी सव्वा दोनला शेवगाव शहरातील क्रांतीचौक, शिवाजी चौक, भगतसिंग चौक, नाईकवाडी मोहल्ला, धनगरगल्ली, मोची गल्ली, आंबेडकर चौक, क्रांती चौक तसेच सायंकाळी चारला अमरापुरला रुटमार्च काढण्यात आला.