अरहान अलिम शेख याचा पहिला रोजा पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ :  येथील अरहान अलीम शेख या पहिलीतील विद्यार्थ्यीने पवित्र रमजान महिन्यातील एक दिवस रोजा करून संध्याकाळी इफ्तारच्या वेळी नियमाप्रमाणे तो सोडला. हा रोजा १४ तासांचा होता. उन्हामध्ये या बालकाने रमजान महिन्यातील व आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.

इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहेत. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात. प्रामुख्याने सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत. परंतु अरहानने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला आहे.

रोजा सोडण्यापूर्वी अरहानला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलाहार घेऊन त्याने उपवास सोडला. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.