राहाता प्रतिनिधी, दि. २४ : स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी गणेश परिसर समृद्ध केला. अनेक ज्येष्ठ नेत्यांची फळी उभी केली. सत्तांतर झाल्यावर विरोधकांनी संकटे उभी केली तरीही गणेश कारखाना अडचणीत असताना चांगला चालविला. गाळपाच्या सांगतेचा उत्साह गणेश परिसराचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसुलमंत्री, गणेशचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांनी केले.
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व गणेशचे मार्गदर्शक सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पार पडली त्याप्रसंगी आयोजित सोहळ्यात आमदार थोरात बोलत होते. गणेशचे अध्यक्ष सुधिर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, साईबाबा संस्थानचे मा.विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अॅड. नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, सुहास वहाडणे, श्रीरामपूरचे सचिन गुजर, वंदना मुरकूटे, सुरेश थोरात, शरदराव थोरात, धनंजय जाधव, महेंद्र शेळके, शितल लहारे, सुधिर म्हस्के, उद्योजक जयराज दंडवते, विश्वस्त अविनाश दंडवते, नानासाहेब बावके, सचिन चौगुले, अॅड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, गणेश चे कार्यकारी संचालक नितीन भोसले, संजिवनीचे शेतकी अधिकारी शिंदे, यांचेसह संचालक मंडळातील सदस्य, सभासद, शेतकरी, कामगार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अडचणीतील गाळप चांगला पार पाडला, गणेश च्या संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक, कामगार, सर्व खाते प्रमुख यांना शाब्बासकी देत राज्याचे माजी महसुलमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना चिमटे काढले! गणेश कारखान्याचे यंत्र चांगले आहेत, आसवानी प्रकल्प चांगला आहे, सर्वच गोष्टी सुंदर आहेत, मग मागील आठ वर्षात कठीण काळ का आला? मोठं खातं आहे, चांगले चालवतील असे वाटले होते, परतु गणेश च्या मालकीचा पंप दुसर्याला चालवायला दिला होता.
इथले कामगार घरी बसलेले, तिकडून बसेस भरुन कामगार यायचे, इथल्या एमडीला किंमत नव्हती, इथल्या कामगारांना किंमत नव्हती, संचालक मंडळाला किंमत होती का नाही हे माहित नाही. त्या आठ वर्षात असा उत्सहाने कार्यक्रम झाला का? आता चैतन्य आहे, आनंद आहे. मी आणि कोल्हे इथे आलो, तुमचे सह्यांचे अधिकार काढले का? आम्ही आमचे कामगार आणले का? तुमचा पंप तुम्हालाच चालविण्यास दिला, सर्व कामगार तेच, शेतकी खातंही तेच, आम्ही दोघे फक्त अडचण आली तर ती दूर करत होतो, उटी आली तर ती काढत होतो. तुम्ही तुमचा संसार तुम्हीच चालवत होते. आम्ही दोघे फक्त मदतीला होतो. तुम्ही खूप चांगला कारखाना चालविला. म्हणुनच ही उत्साही गर्दी, चैतन्य पाहायला मिळाले.
यावेळी बोलतांना कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखाना या हंगामात सुरु करतांना अडचणी होत्या, कारखाना सुरु करतांना व्यावसायिक हेतु न ठेवता भावनिक हेतु ठेवून सुरु केला. पेपर मधुन ज्यांनी कारखाना चांगला चालावा म्हणून शुभेच्छा दिल्या, त्यांनीच अडथळे आणले. कोर्ट कचेर्या झाल्या, या हंगामात उत्पादित केलेली 60 ते 70 कोटीची साखर गोडावून मध्ये आहे. मालतारण कर्जावरही अडचणी आणल्या परंतु शेतकरी, उस उत्पादक यांनी काळजी करु नये. एका निकालाच्या आधारे अतिरिक्त साखर विक्री कारखाना करेल. गेल्या आठ महिन्यात 7 कोटी 65 लाख रुपये कामगारांचे देणे अदा केले. अतिरिक्त साखर विक्री करुन राहिलेले शेतकर्यांचे पेमेंट देवू असा विश्वास त्यांनी दिला.
स्वागत कारखान्याचे अध्यक्ष सुधिर लहारे यांनी केले. ते म्हणाले, कै.शंकररावजी कोल्हे यांनी या परिसरात गणेश बंधारे उभारले, त्यांना हा परिसर कधीच विसरणार नाही. यंदाचा हंगामही आमदार थोरात, विवेक कोल्हे यांचेसह सभासद, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी, उस तोडणी मजुर यांच्यामुळे यशस्वी झाला. प्रास्तविक कार्यकारी संचालक नितीनराव भोसले यांनी केले. आभार उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी मानले.
या प्रसंगी संचालक सर्व श्री भगवानराव टिळेकर, अनिल गाढवे, संपतराव चौधरी, मधुकर सातव, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, संपतराव हिंगे, बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, संचालक शोभाताई गोंदकर,अरुंधती फोपसे, कमलताई धनवटे,गंगाधर चौधरी, सर्जेराव जाधव,संजय शेळके, डॉ. वसंत लबडे, भाऊसाहेब चौधरी, सुरेश गमे, रामचंद्र बोठे, विक्रांत दंडवते,भिकाजी घोरपडे, विठ्ठल गमे, संजय जेजुरकर, पुंडलिक वाघे,भाऊसाहेब थेटे, गोरक्षनाथ एलम, दिलीप सातव, रमेश गागरे, आर. बी. चोळके, श्यामसुंदर डेंगळे, भारत तुरकणे, अरविंद फोफसे, बलराज धनवटे यांचेसह सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी श्री गणेश कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.