कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांच्या कामाचा ६.६२ कोटी निविदा प्रसिद्ध – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : चार वर्षात रखडलेल्या रस्ते विकासाला चालना देवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा मिटविण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. ज्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेलीं नाहीत अशा सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले असून त्यापैकी ६.६२ कोटीच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Mypage

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या रस्त्यांचा विकास रखडल्यामुळे त्याचा परिणाम दळणवळणावर होवून नागरिकांना अडचणी येत होत्या. या अडचणी कायमच्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी रस्ते विकासासाठी चार वर्षात ४६० कोटी निधी आणला आहे.

Mypage

त्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांच्या अडचणी दूर होवून विकासाला चालना मिळाली आहे. तरी देखील ज्या रस्त्यांच्या कामांना अद्याप निधी मिळालेला नाही. त्या रस्त्यांना लवकरात लवकर निधी मिळावा, प्रशासकीय मान्यता मिळावी व लवकरात निविदा प्रसिद्ध होवून रस्त्यांच्या कामास सुरुवात व्हावी व नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरूच असतो.

Mypage

त्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील तीन अतिशय महत्वाच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये रवंदे, टाकळी, पवार गिरणी संवत्सर, भोजडे, जिल्हा रस्ता (प्रजिमा-५) मध्ये सुधारणा करणे. २ कोटी ३२ लक्ष ९५ हजार ५०३,  रा.मा. ७ धामोरी, रवंदे, ब्राम्हणगाव, येसगाव, करंजी, पढेगाव, दहेगाव बोलका, धोत्रे, खोपड़ी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे.

Mypage

२ कोटी ३२ लक्ष ६७ हजार ४८६ तसेच धारणगाव, कुंभारी, माहेगाव देशमुख, सुरेगाव रा.मा. ७ रस्ता सुधारणा करणे १ कोटी ९५ लक्ष ६३ हजार ८५६ अशा एकूण ६.६२ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असल्यामुळे या सर्व गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Mypage