आव्हाणे बु. येथे संकष्टी चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० :  तालुक्यातील श्रीक्षेत्र आव्हाणे बु येथील निद्रिस्त गणपती देवस्थानात शनिवारी (दि.३०) संकष्टी चतुर्थी निमित्त दिवसभर असंख्य भाविकांनी दर्शनबारी लावून श्री गणेशाचे भक्ती भावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ ला पैठण वरून कावडीने आणलेल्या गंगाजलाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मुरलीधर भुसारी यांचे हस्ते श्रींना महाभिषेक घालून आरती करण्यात आली.

दुपारी १२ वाजता भाविकांसाठी फराळाची व्यवस्था स्व. तुळसाबाई मुरलीधर भुसारी यांच्या समरणार्थ शिवाजी मुरलीधर भुसारी यांच्यावतीने करण्यात आली. सायं ६ ला, झी टॉकीज फेम ह.भ.प.बालकीर्तनकार व गायनाचार्य श्वेता दीदी बढे सोमठाणे यांचे जाहीर हरी कीर्तन झाले. सायंकाळी ७ ला पाथर्डीचे बालरोग तज्ञ डॉ. शरद माणिक कचरे यांच्या हस्ते श्रींची आरती व महाअभिषेक करण्यात आला.

रात्री साडे आठला भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री १० वा. आव्हाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळ व दादोबा देव एकतारी भजनी मंडळीने जागर कार्यक्रम केला. दिवसभर दूरवरून आलेल्या असंख्य भाविकांची दर्शनासाठी तर अनेकाची नवस फेडण्यासाठी झुंबड उडाली होती.

देवस्थान टस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजी भुसारी, सरचिटणीस अर्जुन सरपते माजी विश्वस्त अंकुश कळमकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, कारभारी तळेकर, रामदास दिवटे, कार्यालयीन सचिव लक्ष्मण मुटकुळे, ज्ञानेश्वरचे संचालक बबन भुसारी, आव्हाणे वि.का. सेवा संस्थेचे अध्यक्ष अंबादास कळमकर, संजय भुसारी यांनी सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.