सुरेगाव प्रतिनिधी, दि. २६ : गावाने मला सरपंच पदाची संधी दिल्याने मी गावाचा विकास करू शकले हे विकास कामे काही समाजकंटकांना जिव्हारी लागत असल्याने मध्यरात्रीला १० ते १५ जणांच्या टोळक्याने आमच्या घरी येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याने आमचे घरावर भ्याड हल्ला करण्यात आला असल्याचे कोळगावथडी ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी मोठे बाबा मच्छिंद्रनाथ हे ऐतिहासिक मंदिर असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठेबाबा यात्रौत्यव जातिय सलोखा ठेवून मोठ्या उत्साहत साजरा करण्याची तयारी झाली होती. परंतु काही गावातील समाजकंटकांनी मध्यरात्रीला सरपंचांच्या घरी जाऊन यात्रा उत्सव मध्ये बॅंजो लावला नाही, मोठेबाबा मंदिराची स्वच्छता चांगली केले नाही हे निमित्त साधून मध्यरात्रीला दहा ते पंधरा समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मोठमोठ्याने ओरडून शिवराळ व अश्लील भाषेत दमबाजी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. गवळी म्हणाल्या यात्राउत्सव कमिटी मध्ये माझे पती चंद्रशेखर गवळी खजिनदार आहे म्हणून यांचे अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली तू यात्रा उत्सव समितीचा खजिनदार आहे, तुला समजले नाही का? बॅंजो लावायचा आम्हाला नाचायचं आहे. तुझी बायको लय शायनिंग मारते या गोष्टी महागात पडतील असे उद्गार करून गावाचा व यात्रा उत्सवाचा शांतता भंग करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करावी.
मोठे बाबा यात्रा उत्सवाचे कमिटीचे व देवस्थानचे फ्लेक्स बोर्ड फाढून त्यांची विटंबना करण्यात आल्याने आमच्या जीविताला धोका असून तसेच आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे असे शेवटी म्हणाले असून घटनास्थळी कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार गजानन दांडेकर पोलिस नाईक किसन सानप,आदिंनी भेट दिली असून समाज कंटकावर कडक कारवाई करण्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले असून गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
यात्रोत्सवाचे फ्लेक्स बोर्ड फाडणे, मध्यरात्रीला महिला सरपंच यांच्या घरी १० ते १५ समाजकंटक जाऊन यात्रा उत्सवातील समस्याचे राहिल्याचे कारण सांगून अश्लील भाषा वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी देतात. तसेच गावाचा व मोठेबाबा यात्त्रोत्सावाचा शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर वेळीच बंधने घातले नाही तर ते उद्या कायदा हातात घेऊन मोठा गुन्हा घडवू शकतात ही शक्यता नाकारता येत नसल्याने या समाज कंटकावर कडक कारवाई करण्यात यावी.
कांचन दिपक राऊत
पोलीस पाटील, कोळगाव थडी