महसूलच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे अवैध वाळू तस्करी करताना पकडलेल्या वाळू तस्करांनी थेट कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसलेंना दमदाटी करीत तलाठ्याला मारहान, धक्काबुक्की करीत दमदाटी केल्याने संपूर्ण महसुली यंञणा दहशतीत आहे. दमबाजी करणाऱ्यांना त्वरीत अटक करावी. यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने तालुक्यातील वातावरण टाईट फिट झाले आहे.
या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी २४ मार्च रोजी मध्यराञी दत्तात्रय कोल्हाळ, डी जी वाघ तलाठी, योगेश साळुंके, भास्कर गायकवाड कोतवाल, ह्या महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील कुंभारी येथील वनविभागाच्या जागेतून अवैध वाळू वाहतुक करत असताना टाटा कंपनीचा टॅम्पो एम. एच. ०४ इ. एल. ९३३५ या क्रमांकाचा बाबासाहेब शिवाजी जाधव रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव यांच्या मालकीचा दिड ब्रास अवैध वाळू घेवून जात असताना आढळून आला.
त्याला महसूल पथकाने ताब्यात घेवून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात घेवून आले असता. संबंधीत टॅम्पोचालक बाबासाहेब जाधव याने आपल्या इतर दोन सहकारी अझर इस्मौद्दीन शेख व तुषार दिपक दळे रा. कोपरगाव यांना बोलावून आमच्या गाड्या का पकडता. इतरांकडून पैसे घेवून त्या वाळूच्या गाड्या सोडता मग आम्हाला का आडवता. जर असं करत असाल तर येथे कशी नोकरी करता तेच बघतो असे म्हणत थेट तहसीलदार संदीप भोसले यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. तर तक्रारदार तलाठी यांना मारहान करून दमदाटी करुन तहसीलदार परिसरात राडा केला. तहसीलदार भोसले यांनी तात्काळ पोलीसांना बोलावून घेतले. पोलिसांना पहाताच दमदाटी करणारे वाळू तस्करांनी तिथुन धुम ठोकली.
तहसीलदार भोसले यांच्या आदेशाने तलाठी गणेश दिलीप वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये राञी उशिरा संबंधीत तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा करुन, मारहान केल्याची तक्रार राञी उशिरा दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. पोलीसांनी तपास चक्रे फिरवली. माञ, आजून तरी दमदाटी करणारे हाती लागले नसल्याने कोपरगावच्या महसुली यंञनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत वाळू तस्करांचा निषेध केला. दमबाजी करणाऱ्यांना त्वरीत अटक करावी तसेच महसूल पथकाला पोलीस संरक्षण मिळावे. यासाठी दिवसभर तहसील कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनात निवासी, नायब तहसीलदार सह विविध शाखांचे कर्मचारी सामिल होते.
तहसील कार्यालयाच्या अवतीभोवती बड्या वाळू तस्करांचा कायम गराडा असतो. महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांशी वाळू तस्कराचे आर्थिक हित संबंध असल्याशिवाय तालुक्यात बेकायदा बेसुमार वाळू तस्करी कशी चालु आहे. बड्या वाळू तस्करांना महसूल यंत्रणा आजपर्यंत का पकडू शकली नाही?. राञभर कोणाच्या आशीर्वादाने वाळु तस्करी सुरु असते?. एखाद्या गाडीला पकडून कारवाईचे कागदपञ रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर गाड्या का दिसत नाहीत?. काही तस्कर दिवसाढवळ्या वाळू उपसा करत असुनही महसूल यंञणा आंधळ्या सारखी गप्प बसण्याचे कारण काय? असे प्रश्न सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. वाळू तस्करांना वर्षानुवर्षे बळ कोण देते? वाळू तस्करांची मुजोरी कायम का वाढत चालली आहे यावर महसुली यंञणेने प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे.