पोपटराव आवटे यांना मा.ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : ‌ तालुक्यातील दहिगावने संचलित भातकुडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मधील प्रा. पोपटराव हरिश्चंद्र आवटे यांना नुकताच शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्था नेवासा यांच्या मार्फत दिला जाणारा राज्य स्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच ह.भ.प.सुनिल गिरी महाराज यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला.

यावेळी कॉ. बाबा अरगडे, निवृत्त शिक्षण अधिकारी (गंगापूर) धोंडीराम सिंह राजपूत व शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. डॉ.नरेंद्र घुले पाटील, संस्थेचे सचिव तथा मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, माजी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, माजी.सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, प्रशाकिय अधिकारी के.वा.नजन यांनी आवटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.