कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोपरगाव तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा डाऊच वसाहत येथे उर्दू, इयत्ता २ री मध्ये शिकत असलेली कु.खदीजा मजहर शेख ( वय ७ वर्ष) हिजे ने पवीत्र रमजानचे पुर्ण महिन्याचे ३० रोजे ( उपवास) करून आपल्या संस्कृतीचा नवा विक्रम केला आहे.
कडक रखरखत्या उन्हात अन्न पाण्याचा शंभर टक्के त्याग करून दिवसभर अन्न पाणी न घेता तटस्थ संपूर्ण दिवसभर ईश्वराची आराधना करीत पुर्ण महिना भर रोजे (उपवास ) ठेवल्याने कमी वयात तब्बल महिनाभर उपवास करणाऱ्या कु.खदीजा शेख हिचे सर्वांना विशेष कुतुहल वाटतं आहे.
मोठ्या समजदार माणसांना इतके कडक रोजे धरणे शक्य होत नाही माञ कु. खदीजा शेख हीने बालवयात होणारे उपवास करून दाखवले आहे तीला तिची आई, वडील, आजी, आजोबा, नातेवाईक, शिक्षक व गावकरी आदी कडून शुभेच्छा देण्यात आलल्या, तसेच सर्वत्र तीचे कौतुक होत आहे.