शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील ढोरजळगाव शे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विदयार्थिनी कु. मृणाल ज्ञानेश्वर फसले ही राज्यस्तरीय मंथन प्रसाशोध परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकली आहे. तीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत ढोरजळगाव शे च्या जि. प. शाळेतील इ.२रीची विदयार्थिनी मृणाल ज्ञानेश्वर फसले हिने १५० पैकी १३६ गुण मिळवीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ८ वा तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामध्ये मृणालला मुख्याध्यापक गोरक्षनाथ दुसुंगे, वर्गशिक्षिका सिंधुताई देवकर, गोरक्ष आव्हाड, प्रमोद देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून नाव मिळवल्याबद्दल शेवगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी एकनाथ पटेकर, शैलजा राऊळ, डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख सुभाष नन्नवरे, कारभारी गरड, सुनील पायमोडे आदींनी मृणालचे अभिनंदन केले.
ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शेषराव गिऱ्हे, दिगंबर साबळे, संभाजी फसले, विकास देशमुख, कैलास देशमुख, ज्ञानेश्वर फसले, डॉ. प्रदीप पाटेकर, हसन शेख, अविनाश पाटेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.