शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : सध्या या परिसरात शेअर ट्रेडिंग मार्केटच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याच्या स्पर्धा लागल्या असून अनेकानी या अमिषाला बळी पडत आपली आयुष्यभराची कमाई साठवून ठेवलेली पुंजी पणाला लावली आहे. त्याचा फायदा घेत या व्यवसायात मोठी माया कमावून अचानक रात्रीतून आपला गाशा गुंडाळून आता पर्यंत अनेक जण परागंदा झाले आहेत. या संदर्भात रोजच नवनवीन किस्से घडत आहेत.
लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे हा तरुण अनेकांना लाखोचा चूना लावून आपला गाशा गुंडाळून परागंदा झाला आहे. मात्र, त्याच्या कड़े गुंतवणूक केलेल्या काही संतप्त जणांनी त्याच्या राहत्या घरात आणि कार्यालयात घुसुन मिळेल त्या साहित्याची लूट केली. यावेळी तेथे सापडतील ते साहित्याची गुंतवणूकदारांनी पळवा पळवी केली. यात गुंतवणुक दारा व्यतिरिक्त लोकांनी ही हात धुवून घेतल्याची चर्चा आहे.
लाडजळगाव येथील रहिवासी असलेला वैभव ज्ञानेश्वर कोकाटे शेअर मार्केटचा बिगबुल याच्या कार्यालयाची आणि घराची फसवणूक झालेले गुंतवणूकदारानी दाना दान केली. कोकाटे या तरुणाने नुकताच ३० मार्चला विवाह केला होता. तो अचानक ८ एप्रिलला सर्वा सह गायब झाला आहे. मात्र, त्याबद्दल आता पर्यंत तेरी भी चूप व मेरी भी चूप अशी परिस्थिती होती.
दोन दिवसापूर्वी मात्र काहीं संतप्त गुंतवणूकदारांनी त्याचे घर, कार्यालय लुटले. आतील फर्निचर घरसाहित्य डबे, भांडे ज्याच्या हाताला जे लागेल ते लुटून नेले मात्र, तरीही या संदर्भात कोकाटेच्या कोणी वा गुंतवणूक दारापैकी कोणी देखील पोलिसात पुढे येऊन तक्रार दिलेली नाही.
यासंदर्भात अनेक राजकारणी, व्यापारी, इलेक्शन एजंट, नोकरदार, सरकारी, निम सरकारी कर्मचारी, महामंडळाचे कर्मचारी, सरकारी बँकातून कमी व्याजदराने कर्ज घेऊन ज्यादा व्याजाच्या अमिषा पोटी कोकाटे कडे पैसे गुंतले होते.