शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुकामाता देवस्थानात बुधवारी (दि.१७) श्री रेणुका माता मल्टिस्टेटचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत नाना भालेराव यांचे व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत वासंतिक नवरात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी वे.शा.सं. सच्चिदानंद देवा, तुषार देवा, रमेश भोंग, श्रीनिवास कुलकर्णी या देवस्थानच्या ब्रम्हवृंदांनी पौरोहित्य केले.
येथील श्री रेणुकामाता देवस्थानात मंगळवारी दि.९ चैत्र शुद्ध प्रथमेला सार्वजनिक वासंतिक नवरात्रोत्सव भाविकांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आला होता. गेल्या सप्ताहभर भाविकांनी रोजच श्री रेणुकाआई साहेबांच्या दर्शनाला उत्स्फूर्तपणे सकाळ संध्याकाळी हजेरी लावली.
वासंतिक नवरात्रोत्सवाची सांगाता चैत्र शुद्ध नवमीला झाली. बुधवारी १७ तारखेला रामनवमीला सकाळी ६ ला मंदिर उघडण्यात आले ७ ला घट उथ्थापन करुन ८ला नवचंडी होम प्रारंभ झाला. साडेआठला मातेला महाअभिषेक घालून होमाची पूर्णाहुती करण्यात आली. त्यानंतर साडेअकराला महा नैवेद्य व महाआरती झाली.
देवीचा छबीना मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बाराला श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर देवस्थानात दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेआठला आईसाहेबांना पौर्णिमे पर्यंत पाच दिवस निद्रावास देण्यात आला.
उत्सव काळात हनुमान टाकळीचे महंत रमेश अप्पा महाराज, मुंबईचे उद्योजक व भाविक राजेंद्र व यश परसावत, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव, जयंती भालेराव, योगिता भालेराव, श्रीमंत घुले, प्रा. जनार्दन लांडे पाटील, चंद्रकांत गायकवाड, डॉ. अरविंद पोर्टफोडे, बाळासाहेब चौधरी, रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, सुनिल रासने, संजय फडके, प्रज्ञेश भालेराव, गौरी, रुद्रांश व देवांश भालेराव, राजेंद्र नांगरे, आशुलिंग जगनाडे, राहूल वाघमारे, आदिसह अनेक भाविकांनी आईसाहेबांची पूजा बांधली.