श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : नुकत्याच जाहिर झालेल्या एन.एम.एन.एस.या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने अभुतपुर्व यश संपादन केले. यामध्ये एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत साई नारायण कुलकर्णी हा विदयार्थी पात्र झाला असून हया विदयार्थीला दरवर्षी १२०००/- रुपये याप्रमाणे इयत्ता ९ वी ते १२ वी अखेर चार वर्षांसाठी ४८०००/- रुपये विदयार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

सोबतच विदयालयातील पाच विदयार्थ्यांस सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून त्यांमध्ये सायली अरुण घोडेराव, जान्हवी सचिन गूळे, साई दादासाहेब डांगे, पार्थ मच्छिंद्र लोहकणे, सुजल गजेंद्र साबळे हे विदयार्थी पात्र झाले.

या विदयार्थ्यांना एकूण दोन लक्ष चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व यशस्वी विदयार्थीचा गौरव करण्यात आला. पाहुण्याचे स्वागत उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी यशस्वी विदयार्थी अभिनंदन करुन पुढील वाटचालीत मदत करण्याचे जाहिर केले.

संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी यश संपादन केलेल्या विदयार्थीना या परीक्षेचा पुढील वाटचालीत निश्चितच फायदा होईल असे सांगितले. शेवटी आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्वेता मालपुरे यांनी केले. या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या या विदयार्थ्यांना कुलदीप गोसावी, पंकज जगताप, जी.एन.जाधव, एस.डी.जाधव मॕडम आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. 

कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य संदीप अजमेरे, आनंद ठोळे, डाॕ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी विदयार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.