निराधाराला निवारा देण्याचे टेके पाटील ट्रस्टचे कार्य सर्वश्रेष्ठ – सुहास गोडगे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : मनुष्य म्हणून प्रत्येक जण जन्म घेतो. लहानचा मोठा होतो. या जीवन प्रवासादरम्यान एखादी अनपेक्षित घटना घडून जाते. आणि त्यातून त्या मनुष्याचे जीवनच बदलून जाते. अशा धक्क्यांमधून एखादी व्यक्ती मनोरुग्ण होऊन नंतर निराधार होते. अशावेळी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु; मानवतेच्या भावनेतून त्यांची जाणीव ठेवून त्यांना मदत करण्यासाठी पुढे येणारे हात खूप महत्त्वाचे असतात. याच जाणिवेतून निराधार मनोरुग्ण विक्रम तानसरे यांना डोक्यावर छत मिळून देण्याचे राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य सर्वश्रेष्ठ असल्याचे गौरवोद्गार सोमय्या उदयोग समूहाचे संचालक सुहास गोडगे यांनी काढले. 

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ, भरतवाडी यांच्या सौजन्याने भरतवाडी येथील बेघर मनोरुग्ण निराधार विक्रम पानसरे यांना मानवतेच्या भावनेतून बांधून देण्यात आलेल्या छोट्याश्या निवाऱ्याचे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमय्या उदयोग समूहाचे संचालक सुहास गोडगे यांच्या हस्ते फित व श्रीफळ वाढून लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी वारी ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर निळे, कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे माजी उपाध्यक्ष रामदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप काकळे, अशोक निळे, योगेश झाल्टे, कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष संजय टेके, कामगार प्रतिनिधी विशाखा निळे, माजी सरपंच हिम्मत भुजंग, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दिलीप गडकरी, गोदावरी बायोरिफायनरीचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील,

ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके, किसन पगारे, महेंद्र गडकरी, क्रीडाशिक्षक संजय अमोलिक, नामदेव आभाळे, राजेंद्र ठाकूर, विजय ठाकरे, दीपक झाल्टे, सुंदर पगारे, शंकर धामणे, स्वप्निल टेके, भैय्या रोकडे, बाळू पांडव, सोन्या रोकडे, भैय्या चंदनशिव, किरण टेके, भैया टेके, सरला किरोते, आशा रोकडे, ताई माने, सोन्या चंदनशिव, सुमित झाल्टे, अमित झाल्टे, सक्षम आवारे, यश झाल्टे यांच्यासह राहुल दादा मित्र मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.