कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने काळाची गरज ओळखुन मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाच्या नवोदित अभियंत्यांना ऑटोमेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देवुन प्रशिक्षित केले व कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले. यात फेथ ऑटोमेशन या भारतातील व परदेशातील वाहन निर्मिती कंपन्यांसाठी इंडस्ट्री ४.० या प्रणालीनुसार कार्य करणाऱ्या स्वयंचलित रोबोटिक लाईन्स डिझाईन सोलुशन देणाऱ्या अग्रगण्य कंपनीने सहा नवोदित अभियंत्यांची डीझाईन इंजिनिअर या पदावर निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
फेथ ऑटोमेशन कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये अनमोल कुमार, मोहम्मद लाराईब आलम, अथर्व सुनिल नाईक, रोहन संतोश गडाख, साईश निलेश सोनवणे व सिध्दार्थ किरण उगले यांचा समावेश आहे.
संजीवनी पॉलीटेक्निक मधुन नोकरी हमखास मिळते हे मला माहित होते, म्हणुन मी येथेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. सध्या सर्वच कारखान्यांमध्ये ऑटोमेशनला खुप महत्व आहे. आम्हाला पाचव्या सत्राला इंडस्ट्रीयल ऑटोमेशन हा विषय होता. तो आमच्या विभागाने प्रात्यक्षिकांसहित शिकविला तसेच रोबोटिक्सचा जेथे वापर होतो, त्या इंडस्ट्रीजमध्ये प्रत्यक्ष भेटी देवुन कार्य समजविण्यात आले. आम्हाला ऑटोमेशन क्षेत्रातील पीएलसी, स्काडा, एचएमआय अशा विविध क्षेत्रातील सखोल ज्ञान देण्यात आले. तसेच अमच्या टी अँड पी विभागाने आमचा मुलाखतींचा भरपुर सराव करून घेतला. यामुळे आमच्या टी अँड पी विभागाने जेव्हा फेथ ऑटोमिशन कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह जेव्हा आयोजीत केला. तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना मी सहज उत्तरे देवु शकलो, आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत माझी चांगल्या पगारावर अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड झाली. माझ्या आई वडीलांनी डोळ्यात साठविलेले स्वप्न संजीवनी पॉलीटेक्निकने पुर्ण केले. – नवोदित अभियंता सिध्दार्थ उगले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विदयार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व प्राचार्य ए.आर मिरीकर यांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार केला.
यावेळी डीन अकॅडेमिक्स डॉ.के.पी. जाधव, टी अँड विभागाचे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. मोहीनी गुंजाळ, समन्वयक प्रा. नितीन आहेर व प्रा. पुणम थोरात उपस्थित होते.