प्रा. डॉ. झावरे यांचा सेवापूर्ती निमित्त माजी विदयार्थ्यांनी केला सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५  : येथील अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे न्यूआर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या माजी विदयार्थ्यांचा गुरुवंदना कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या महाविदयालयाच्या रसायन विभागाच्या माजी विदयार्थ्यांनी शेवगाव महाविदयालयाचे रसायन शास्र विभागाचे माजी प्रमुख तथा नगर येथील महाविदयालयाचे विदयामान प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांचा सेवानिवृत्तिनिमित्त त्यांचा व तत्कालीन सर्व माजी प्राध्यापकांचा हृद्य गौरव सोहळा आयोजित केला होता.

अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शिवाजी देवढे होते. यावेळी शोभाताई झावरे, प्रा. डॉ. पुरूषोत्तम कुंदे, प्रा.परशुराम गणगे, प्रा. डॉ.सुभाष कडलग, प्रा. डॉ. रावसाहेब कासार, प्रा.डॉ.नामदेव कोल्हे, प्रा. नामदेव कुसाळकर, प्रा.उत्तम मरकड, प्रा. दत्तात्रय वाबळे, प्रा. डॉ. अण्णासाहेब काकडे, प्रा. पुंजाराम आंबेकर, ग्रंथपाल प्रा. जनार्दन लांडे पाटील, प्रा.अशोक देशमुख, प्रा.लियाकत देशमुख, दत्तात्रय लोखंडे, सुभाष गड़ाख, अधिक्षक दत्तात्रय काटे, सर्जेराव तानवडे,   दत्ता लोखंडे, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रा. शिवाजी देवढे यांनी अंत्यत संयमी आणि शांत डोक्याने काम करणारा प्रशासनातील अनमोल हिरा म्हणजे प्रा. डॉ. भास्कर झावरे अशा शब्दात डॉ. झावरे यांचा गौरव केला. प्रा. देवढे पुढे म्हणाले, शेवगावात पाण्याची भिषण समस्या, प्रतिकुल परिस्थिती, विदयार्थ्यांनी मोर्चा काढले, आंदोलन केले अशा कठीण परिस्थितीत डॉ. झावरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन त्यामधून मार्ग काढला व महाविदयालय चालवण्यासाठी अनमोल साथ दिली.

डॉ. झावरे यांचा तसेच मंचावर उपस्थित तत्कालिन अध्यापक व कार्यालयीन स्टाफचा  १९८५ च्या विदयार्थ्यानी कृतज्ञता पूर्वक सन्मान केला.
सत्काराला प्रा. झावरे यांनी अत्यंक भाऊक होऊन उत्तर दिले. डॉ. झावरे म्हणाले, ‘शेवगावची माती आणि येथील माणसे अविस्मरणीय आहे. त्यामुळे समृद्ध आणि संस्कारी जीवन जगता आले. त्या शिदोरीच्या जोरावर जिल्हा मराठा विदया प्रसारक सारख्या संस्थेच्या मोठ्या महाविदयालयाचे प्रा. पद यशश्वी पणे सांभाळता आले.

या काळात देश विदेशातील नामांकित विदयापीठात जाऊन तेथील शिक्षण पद्धत अभ्यासता आली. विदयार्थी आणि शिक्षकांवरून महाविदयालयाची ओळख होत असते. परदेशातील माणसं शिक्षणासाठी विदयापीठाना देणगी देतात. मुलांचे भवितव्य घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थाना मदत करण्यासाठी सर्वानी हातभार लावला पाहिजे. असे आवाहन करून आपल्याकडे मंदिरे मोठी आणि शाळा दुर्लक्षित अशी परिस्थिती असल्याची खंत डॉ. झावरे यांनी शेवटी व्यक्त केली.

माजी विदयार्थी मुख्तार शेख, श्रीमती पुष्पा गरुड, विजय म्हस्के, संजय चितळे, अरविंद देशमुख, प्राचार्य डॉ.शेषराव पवार,  प्रा. काकासाहेब घुले, प्राचार्य  कडलग, उपप्राचार्य डॉ. कासार, प्रभारी प्राचार्य डॉ.  कुंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

आदिनाथ कराड, शिवाजी वाघमारे, रमेश नवल, संजय नरवडे, सोपान नजन, संजय मनवेलीकर, सुनील काकडे, राजेंद्र दारकुंडे, विलास गवळी, दीपक आहेर, प्रा. डॉ .बूथवेल पगारे, योगेश घोडके, राजेंद्र शिंपी, सुनील जोशी, श्रीमती नजमा शेख, विजय शेळके, जनार्धन पठारे, चंद्रकांत गोदावणे, हनुमंत पवार, प्रफुल्ल गोसावी, बंडू घोडेचोर आदिंसह १९८४ च्या बॅचचे रसायनशास्त्र विभागाचे माजी विदयार्थी उपस्थित होते.

मुकुंद आरे, दीपक झाडे, पंडित मरकड, रेखा मोरे यांनी हाताने रेखाटलेले डॉ. झावरे यांचे तैलचित्र त्यांना भेट दिले. प्रा. डॉ.अनिल आठरे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रा.मिलिंद देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले. पत्रकार सुखदेव फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती अनिता पावसे यांनी आभार मानले.