कोपरगाव प्रारतिधी, दि.२६ : राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जिल्ह्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री, सहकार महर्षी, स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा त्यांचे नातू युवा नेते विवेक कोल्हे यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव,आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे.
महापूर, कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात. औद्योगिक वसाहत कोपरगाव चे चेअरमन ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक अशी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा (२७ एप्रिल) वाढदिवस.
केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ नेते, माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा, आदर्श विचार आणि संस्कार यांचा पाठ विवेक कोल्हे यांनी जपला आहे. उत्तम संघटक, आक्रमक वक्तृत्व आणि समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रश्नांची जाण असलेला युवानेता अशी त्यांची ओळख आहे.
विवेक हे तालुका जिल्हा व राज्याच्या सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी नेहमी जेष्ठ व युवकांमध्ये योग्य समन्वय राखला, तसेच समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाचा सर्वांगीण विकास केला आहे, हे त्यांच्या यशस्वी कार्य-कर्तृत्वाचं गमक आहे. कार्यकर्त्यांचा गराडा आणि भेटणाऱ्या नागरिकांची सततची गर्दी विवेक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली आहे.
मा.विवेक कोल्हे हे कुशाग्र बुद्धीचे प्रगल्भ नेते आहेत. त्यांच्यामध्ये भविष्य काळाची पाऊले ओळखण्याची फार मोठी क्षमता आहे. त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन असून त्यांनी आपल्या समूहातील सहकारी संस्थांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या अधिक कार्यक्षम चालविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न केला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारंपारिक गोष्टी बाजूला ठेवत नाविन्यपूर्ण बाबींचा स्वीकार करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे.
तसे वयाच्या 18 व्या वर्षांपासून ते राजकारण, समाजकारणात आहेत. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थेचा कार्यभार पाहताना त्यांनी या कोपरगावच्या कामधेनुला जगाच्या नकाशावर नेले. “जागवूया ज्योत माणुसकीची “हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. 2015 मध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले. गणेश परिसरतील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना शासनस्तरावरून मदत व्हावी, यासाठी शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
विवेक कोल्हे म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांचे कैवारी आहे. शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी ते कायम झटत असतात. कोणताही भेदभाव त्यांच्यात नसतो. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या पाठीमागे ते ठामपणे उभे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गरिबांना त्यांचा मोठा आधार आहे. आम्हाला विश्वास आहे हे शेतकरी, कष्टकरी आणि गरीब लोक कायम त्यांच्या सोबत राहतील.
त्यांचे विचार पुढे घेऊन जातील. ते शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढाई लढत आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यांचे यश निश्चित आहे. यापुढेही त्यांनी असेच काम करत राहावे. ज्या पद्धतीने ते काम करत आहे. त्यामुळे तालुक्याचा जिल्ह्याचा आणि पर्यायाने राज्याचा विकास निश्चित होणार. अशा लढाऊ बाण्याच्या व्यक्तिमत्वा मागे जनतेने मोठ्या संख्येने उभे राहायला हवे.
विवेक कोल्हे हे उच्चशिक्षित, शांत, संयमी व एक अभ्यासू युवा नेते आहेत. त्यांची राहणी अगदी साधी आहे. ते विरोधकांच्या टिका टिपण्णी पेक्षा विकासकामांना, सामान्य माणसाचे जीवन सुखी व समृद्ध करण्यास प्राधान्य देतात. मात्र अगदीचे अति झाले असेल, तर नक्की “करेक्ट कार्यक्रम” हा ठरलेला. गोदावरी नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुराचा फटका कोपरगाव शहरासह नदीकाठच्या भागाला बसला. या पुराच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दोन तीन आठवडे ते दिवसरात्र राबत होते.
स्वत:चा जीव धोक्यात घालून पुरातून अनेक लोकांना वाचविले. पूरग्रस्त कुटुंबाला राहण्याची, भोजनाची सोय, औषधोपचाराच्या सुविधा, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करून दिली. सूर्योदयापासून रात्रीपर्यंत ते पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावत होते. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता, रोगराई पसरू नये याची खबरदारी घेत पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्राला घालून दिला.
राज्यासह तालुक्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही ते लोकांच्या मदतीला धावले. कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला बऱ्याचअंशी यशही आले. नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते. शहरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, दुष्काळ, आरोग्याच्या प्रश्नासोबतच जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी भर दिला आहे.
राजकीय वारसा, घरची परिस्थिती ही खंबीर परंतु, स्वकर्तृत्वावर आपले विश्व निर्माण करण्याचा ध्यास मनाशी बाळगून आपल्या सारख्या असंख्य युवा वर्गाला प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी व्यवसायांची अनेक कवाडे उघडणारा एक ध्येय वेडा युवक अर्थात आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते विवेक कोल्हे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. अगदी या म्हणी प्रमाणेच विवेक कोल्हे यांनी स्वकर्तृत्व सिद्ध करून युवकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम विवेक कोल्हे यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. ध्येयवादी व्यक्तिमत्व सक्षम कर्तृत्व विवेक कोल्हे यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि राज्याचे नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा.
कोपरगाव शहर व तालुक्यातील सुशिक्षित तरुण वर्गाला विवेक कोल्हे यांच्या रूपाने आधुनिक युवा आयडॉल मिळत आहे. त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने येणाऱ्या काळात त्यांचे अशीच भरभराट होत राहो हीच सदिच्छा आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.