शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : येथील पाथर्डी रस्त्यावरील हॉटेल निसर्गच्या जवळील काटवनात रविवारी दि.२८ ला साधारणतः ३० वर्षाच्या बेशुद्धावस्थेत असलेल्या अनोळखी युवकास उपचारासाठी म्हणून पोलिसांनी ग्रामिण रुग्णालयात नेले असता तो अगोदरच मयत झाल्याचे समजले. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
मयत तरुणाचा रंग गोरा असून उंची साडेपाच फूट आहे. चेहरा उभट अंगाने सडपातळ आहे. काळ्या हिरवट रंगाच्या टी शर्टवर लालपांढरे पट्टे असलेला फूल बाह्याचा टीशर्ट व निळ्या रंगाची जीन पँट घातलेली आहे.
शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तरी हा युवक कोणी ओळखीत असल्यास शेवगाव पोलिस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन शेवगाव पोलिसांनी केले आहे.