वीज चोरी प्रकरणी एक कोटी २८ लाखांचा दंड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७: महावितरण सुरक्षा अंमलबजावणी  विभागाच्या १२ विविध भरारी पथकांच्या माध्यमातून शेवगाव कर्जत जामखेड विभागा अंतर्गत वीज चोरी विरोधात अचानक तपासणी मोहीम नुकतीच राबविण्यात आली.      या मोहिमेत अडीचशे ग्राहकाच्या वीज मीटरची व परिसराची तपासणी केली असता कर्जत श्रीगोंदा उपविभागात फक्त एक एकच वीजचोरी आढळली.

तर महावितरणच्या शेवगाव उपविभागा अंतर्गत वीज चोरी प्रकरणी १६३ ग्राहकांची तपासणी  झाली यामध्ये १२९  घरगुती ग्राहकांना ८१ लाख ८६ हजार ३३८ रुपये, वाणिज्य विभागातील ३१ ग्राहकांना ४२ लाख ७ हजार ६०० रुपये, तर औद्योगिक दोन ग्राहकांना चार लाख ४९ हजार ४८० रुपये असा एकूण एक कोटी २८ लाख ४३ हजार ४९८ रुपये दंड करण्यात आला आहे.