श्रीक्षेत्र चास ते देहु-आळंदी पायी दिंडीचे १४ नोव्हेंबर रोजी प्रस्थान  

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळयाचे १४ ते २५ नोव्हेंबर या काळात आयोजन करण्यांत आल्याची माहिती हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांनी दिली. 

ते म्हणाले की, श्रीक्षेत्र चासनळी येथुन १४ नोव्हेंबर रोजी दिंडी देहुकडे प्रस्थान करून २५ नोव्हेंबर रोजी देहुरोड येथे दिंडी मुक्काम करेल. या दिंडी सोहळयात हभप बाबुराव महाराज चांदगुडे हे सामाजिक प्रबोधनाबरोबरच बेटी बचाव बेटी पढाओ, परिसर स्वच्छता, व्यसनमुक्ती, युवापिढीला मार्गदर्शन करून ज्येष्ठांना विविध ग्रंथातील मार्गदर्शक तत्वांचे ज्ञान देवुन हरिभक्तीबरोबरच सामाजिक उददेशाची ज्ञानदानदिंडी ते यशस्वीरित्या चालवितात त्याबददल त्यांचे अनेकांनी स्वागत केले. तरी भाविकांनी या देहु आळंदी पायी दिंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.