कोपरगावमध्ये आमदार काळेंच्या प्रचाराचा वेग वाढला

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन मतदार संघातील गावागावात प्रचार करुन मतदारांपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असतानाच सोमवारी कोपरगाव शहरात शेकडो  कार्यकर्त्ये व नागरीका समवेत आमदार आशुतोष काळे यांनी प्रचार रॅली काढली.

आमदार काळे यांच्या प्रचार रॅलीने संपुर्ण कोपरगाव काळे समर्थकांचे गजबजून गेले होते. मुख्य रस्त्यावरून शहरातील बाजारपेठेत व आठवडी बाजार असल्याने बाजार तसेच जनावरांच्या बाजारातही काळे यांच्या प्रचार फेरीने लक्ष वेधले होते. रॅली मध्ये स्वयंस्फुर्तीने नागरीक, महीला सामील झाल्याने रॅलीची भव्यता अधिकच वाढत गेली. आमदार काळे मतदारांना हात जोडत मतदान करण्याची विनंती करीत होते तर नागरी स्वता: होवून काळेंच्या जवळ येत त्यांना आशीर्वाद देत होते.

आमदार काळे हे अनेक जेष्ठ नागरीकांचे दर्शन घेत असल्याचे पाहून सर्वांना कुतुहल वाटतं होते. आत्तापर्यंतची या निवडणुकीतील हि विक्रमी गर्दीची प्रचार फेरी असल्याची चर्चा नागरीक करीत होते. आमदार काळे यांच्या विनम्र स्वभाव सर्वांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करीत असल्याचे दिसत होते. 

 आमदार काळेंनी शहर विकासासाठी अनेक योजना आणल्या. मुख्यता शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी पाच नंबरचे नवं तळ बांधून शहराची तहान भागवल्या ची चर्चा नागरीक करीत होते. काळे यांनी पाच वर्षात केलेला  विकास मतदारांना प्रगतिकडे घेवून जाणारा आहे अशीही नागरीक जोरदार चर्चा करीत होते. आठवडी बाजारामुळे नागरीक, व्यापाऱ्यांची गर्दी होती अशातच काळे यांना समर्थन करणारे अनेक दर्दी उत्साही होवुन काळेंचा जयजयकार करीत होते. मतदार संघात आमदार काळेंनी प्रचारात आघाडी घेतल्याचे यावरून दिसुन येते. 

 या प्रचार फेरीत आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शहर अध्यक्ष सुनिल गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, दिनार कुदळे, विनायक गायकवाड, डाॅ. तुषार गलांडे, स्वप्नील निखाडे, प्रतिभा शिलेदार, संतोष शेजवळ, सुनिल फंड, धरमचंद बागरेचा, विजय ञिभुवण, नवाज कुरेशी, शैलेश साबळे, दिनेश कांबळे, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब आढाव  यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नागरीक महीला सामिल होते.