विद्या गाडेकर यांची शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ :  शेवगाव  येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदश्चंद्र पवार गटाच्या धडाडीच्या  कार्यकर्त्या श्रीमती विद्या गाडेकर यांची शरद पवार गटाच्या  ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. बारामती येथे सौ.सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या सहीचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.

         गाडेकर या आपल्या विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमातून  सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या नियुक्ती नंतर शेवगाव येथे गाडेकर यांचा छोटेखानी गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देतांना गाडेकर यांनी, आपण   पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व राज्यात भरीव काम करू. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बहूमताने निवडून आणण्यासाठी आपण जोरदार प्रयत्न करू अशी ग्वाही  दिली. 

 यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष  हरिष भारदे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, जिल्हा उपाध्यक्ष राहूल वरे आदिंनी गाडेकर यांचे अभिनंदन करून पुढील  कार्यास शुभेच्छा दिल्या.