काळे- कोल्हे एकञ आले तर विरोधकांकडे काहीच शिल्लक नसणार – फडणवीस 

 शिर्डीच्या खासदाराकडे देशाचे लक्ष

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ९ :  शिर्डीच्या खासदाराकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. शिर्डीच्या खासदाराला मत म्हणजे मोदींना आशीर्वाद आहे. काळे-कोल्हे एकञ आले तर विरोधकांकडे काहीच शिल्लक राहणार नाही. कोपयगावमधून महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक लिड मिळणार ही निवडणुक देशाचा नेता निवडण्याची आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे असे मत राज्याचे देवेंद्र फडणवीस कोपरगाव येथे तहसिल कार्यालय मैदानात (दि.९) दु.१२ वाजेदरम्यान आयोजित महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय संकल्प जाहीर सभेत बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड, बांधकाम मंत्री दादा भुसे, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आ.संजय शिरसाठ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, रवींद्र बोरावके आदीसह विविध आजी माजी पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, कोल्हे परिवाराचा तीन पिढ्यांचा संघर्ष निर्णायक टप्प्यातील आहे. सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा विचार करून कार्यान्वित ही केला. तसाच प्रयत्न स्नेहलता कोल्हे यांनी केला आणि तिसऱ्या पिढीतील युवानेते विवेक कोल्हे यांनीही आग्रही असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वेचे पाणी पश्चिमेला वळवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सूतोवाच केले आहे. या भूमिकेमुळे पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यास मदत मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांची कोल्हेच्या निवासस्थानी सदिच्छा भेट कोपरगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आले असता, माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सत्कार केला. तर ना. फडणवीस यांचे  रेणूका कोल्हे व श्रद्धा कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले. या प्रसंगी नितीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे  इशान कोल्हे आदीसह कोल्हे परिवार उपस्थित होते.

पश्चिमेचे नद्यांचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते, ते पाणी पूर्वेला गोदावरी नदीची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला असून तो लवकरच मंजूर होईल, यासाठी लागणार निधी लागेल, त्यावेळी मोदी है तो मूमकिन है अस म्हणत पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. यासाठी ५० हजार कोटी निधी आवश्यक आहे. तो देण्यासाठी मोदी आहेत. लवकरच हा आराखडा मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावू  स्नेहलता कोल्हे आमदार असतांना कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि विकास केला आहे.

आमदार काळे यांनाही निधी दिला  यापुढेही विकासासाठी सहकार्य करत सरकार म्हणून गेल्या काही काळात मोठा निधी कोपरगावसाठी देण्यात आला आहे. तोट्यात जाणारी साखर कारखानदारी व ऊस उत्पादक यांना जगविण्याचे काम मोदी यांनी केले. शेतकऱ्यांचे १० लाख कोटी रु.चे उत्पन्न कर माफ केले. साखर कारखाने चालावे आणि ऊस उत्पादकांना भाव मिळावा यासाठी निधी उपलब्ध करून दिले आहे. इथेनॉल निर्मितीची मंजुरी देऊन शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचे काम मोदी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे याना निवडून देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आवाहन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले. 

                 या प्रसंगी स्नेहलता कोल्हे आपल्या भाषणात म्हणाल्या की, स्व. शंकरराव कोल्हे यांची अशी शिकवण होती की, देश हितासाठी आणि समाज विकासासाठी राजकीय  जोडे बाजुला ठेवून  जनहीताचे कार्याय  करण्ययासाठी एकञ यायचे. कुठे लढायचे आणि कुठे थांबायचे ही  शिकवण त्यांनी दिली म्हणुन आम्ही मतभेद विसरून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी  एकञ आलोय. देशाचा नेता निवडण्याची ही वेळ आहे. नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय आहेत.

नरेंद्र मोदी आपल्याला परिवार मानतात, म्हणून दिवाळी सैनिकासोबत साजरी करतात आणि शत्रूंना धडकी भरवणारे सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धात आपल्या देशवासियांना सुखरूप आणणारे मोदी आहेत. कोरोना काळात देशाला लसीकरण करून एकही भूकबळी होऊ दिली नाही. घरकुल, आयुष्यमान भारत, उज्वला योजना, आदी योजना दिल्या. आदिवासी महिलेला न्याय देण्याचे काम त्यांनी केलं. लवकरच महिलांना ५० टक्के आरक्षण देणार आहेत. बचत गट महिलांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलं आहे. राज्यात उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील नगर परिषद, बस स्थानक, पोलीस ठाण्याची इमारत, पंचायत समितीची कामे करता आली. म्हणून महायुतीच्या उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

 माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक घोटाळे केले. अनेक घोटाळे केल्याचा आरोप करणारे उध्दव ठाकरे यांनीच पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. याचा अर्थ वाकचौरे यांनी तुपाचा केलेल्या घोटाळ्यातील काही तुप ठाकरे यांच्यापर्यंत पोहचले की काय? यापुढे भाऊसाहेब वाकचौरे यांचे नामकरण करुया तुचोरे असे म्हणत वाकचौरे यांच्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सडकून टीका केली. 

 यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, हि निवडणूक स्थानिक मुद्दे बाजुला ठेवून देशाचा विचार करणारी आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना  निवडून देण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री  व दोही उपमुख्यमंत्री यांनी मतदार संघाच्या विकासासाठी भरभरुन निधी दिला या बद्दल  ऋण व्यक्त केले माञ मतदार संघातील पाणी प्रश्नावर खंत व्यक्त करीत  पाटपाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्या संदर्भात आपली भूमिका काळे यांनी मांडली.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, मी दहा वर्षात अनेक विकास कामे केलो पण त्याची तुतारी वाजली नाही. सर्वाधिक विकास कामे करणारा मी खासदार आहे आणि यापुढेही ही विकास कामांना प्राधान्य देणार आहे आता माझ्या पाठीमागे काळे कोल्हे यांची एकञ साथ असल्याने कोपरगाव तालुक्यात उन सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याची खाञी लोखंडे यांनी व्यक्त करीत विरोधकाचा समाचार घेतला.