संजीवनी पॉलीटेक्निकच्या तीन अभियंत्यांची किर्लोस्करमध्ये निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाने किर्लोस्कर कंपनीला संपर्क साधुन कॅम्पस प्लेसमेट ड्राईव्हसाठी आमंत्रित केले. आपल्या विद्यार्थ्यांना कंपनीमधील प्रचलित तंत्रज्ञानाचे अधिकचे प्रशिक्षण दिले. कंपनीने मुलाखती घेतल्या. यात कंपनीने आवश्यकतेनुसार तीन पदविका अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने अधिकृत प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

  डीझेल इंजिन, डीझेल जनरेटर सेट, इत्यादी मशिनरी बनविणाऱ्या किर्लोस्कर कंपनीने वैष्णवी बाबासाहेब खोंड, आदित्य संजय भनगे व ऋतिक रोशन यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड  पी विभागाकडून विविध नामांकित कंपन्यांना संपर्क साधुन त्यांची कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे, हे जाणुन  विभागनिहाय अधिकचे प्रशिक्षण  दिल्या जाते. तसेच मुलाखतीच्या सर्व शिष्टाचाराचेही प्रशिक्षण  दिले जाते.

जो पर्यंत विद्यार्थी मुलाखतींना सामोरे जाण्यासाठी परीपुर्ण होत नाही, तो पर्यंत त्याच्याकडून तयारी करून घेतल्या जाते, यामुळे कंपन्यांच्या कसोट्यांमध्ये  नवोदित अभियंते सहज उतरत आहे, त्यामुळे शेकडो ग्रामिण भागातील विद्यार्थी नोकरदार होवुन ग्रामीण अर्थकारणाला चालना देवुन आपल्या कुटूंबाचा आधार बनत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी छोटेखानी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, टी अँड  पी विभागाचे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. गिरीश  वट्टमवार, प्रा. मोहिनी गुंजाळ, आदी उपस्थित होते.

मी कोपरगांव तालुक्यातील मळेगांव थडी या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी आहे. मी स्वावलंबी व्हावे, म्हणुन माझ्या वडीलांनी मला संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये शिक्षणासाठी दाखल केले. माझे घर पॉलीटेक्निकपासुन १६ किमी अंतरावर आहे. परंतु कॉलेजचीच बस असल्यामुळे घरूनच येवुन जावुन शिक्षण  पुर्ण केले. आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व विषय  अनुभवी प्राद्यापकांनी शिकविले. टी अँड  पी विभागाने भरपुर सराव करून घेतला, आणि माझी किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. माझे स्वप्न पुर्ण झाले. माझ्या भावानेही येथुनच इंजिनिअरींगचा डीप्लोमा केला. त्यालाही संजीवनीच्याच टी अँड  पी विभागाने नोेकरी मिळवुन दिली. आम्हा दोघा बहिण भावांना संजीवनीमुळे नोकरी मिळाली आणि आमच्या आई वडीलांचे स्वप्नही पुर्ण केले. – नवोदित अभियंता मुलगी वैष्णवी  खोंड