शेवगाव प्रतिनिधी, दि. १४: सीबीएसई बोर्ड इ. १० वी फेब्रुवारी २०२४ परीक्षेत येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कुल मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत १०० टक्के उज्वल यशाची परंपरा कायम राखली. वैभव विठ्ठल ढाकणे ह्याने ५०० पैकी ४६१ (९२.२ टक्के ) गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमाक पटकावला आहे.
या विद्यालयातील अदिती विनोद मुरदारे हिने ५०० पैकी ४५३ गुण ( ९०. ६ , टक्के ) प्राप्त करत विद्यालयात द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक हर्षदा संतोष झिरपे हिने ५०० पैकी ४५० गुण (९० टक्के ) मिळवले , . धनश्री मारुती कोळगे हिने ५०० पैकी ४४९ गुण मिळवत चवथा तर श्रुष्टी मधुकर बैकरे हिने ५०० पैकी ४२६ गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला. या विद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त, १२ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त, ८ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा जास्त तर ९ विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
मागील बारा वर्षापासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या उदात्त उद्देशाने आबासाहेब काकडे शिक्षण समुहाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांनी हे सीबीएसई मान्यताप्राप्त स्कुल सुरू केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेतील प्रवेश परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अधिक पुरक ठरतो. विद्यालयातील अनेक विदयार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
मुलभूत घटकांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यार्थ्यांना हे घवघवीत यश संपादन करता आले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच वळणदार हस्ताक्षर, सामान्यज्ञान, वाचन व लेखनाची गती, अवांतर वाचन आणि आवश्यक ते पाठांतर यावर स्कूलने विशेष भर दिला. डिजिटल शिक्षण प्रणाली व अधिकाधिक सराव याची अंमलबजावणी वर्षभर सुरू होती.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन अॅड. डॅा.शिवाजी काकडे, संस्थेच्या विश्वस्त हर्षदा काकडे, पृथ्वीसिंह काकडे, प्रा.लक्ष्मण बिटाळ, वंदना पुजारी, अशोक आहेर, चिफ कोऑर्डिनेटर प्रा. सुनील आढाव, प्रभारी प्राचार्य बाळू निळ, राम रेवडकर, रूपाली शेटे, संजीवनी वाघमारे, बाळु कांबळे, आदिनाथ ठोंबरे, शितल वैष्णव यांनी केले आहे.