कोपरगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, करंजी येथील दोन महीला जखमी

 कोपरगाव प्रतिनिधी दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील पडेगाव, करंजी, परजणे वस्ती आदी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने अनेकांच्या घरासह शेतीचे नुकसान झाले तर वैजापूर कोपरगाव रस्त्यावरील अनेक झाडं उन्मळून पडल्याने या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

 या घटनेची अधिक माहीती अशी की, गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पढेगाव व करंजी तसेच परजणे वस्ती या भागात अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने या भागातील अनेकांच्या घरावरील पञे उडाले,काही घरांची पडझड झाली, वैजापूर, कोपरगाव रस्त्यावरील पढेगाव शिवारात रस्त्यावर अनेक झाडं उन्मळून पडली होती. यामुळे रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.

करंजी शिवारातील काहींच्या घरांची पडझड झाली यात उषा गोरख ढोले व आशा परमेश्वर मापारी  या दोन महीला जखमी झाल्या असुन त्यांना कोपरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. पढेगाव येथील निलेश प्रभाकर शिंदे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत.

या भागातील विजेचे खांब, शेतकऱ्यांचे कांद्याचे शेडसह उभे पिकं भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्थीक नुकसान झाले आहे. या संदर्भात तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी अधिक माहिती देताना म्हणाले या वादळी वाऱ्याच्या पावसात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरीही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

रस्त्यावर उन्मळून  पडलेले झाडे त्वरीत बाजुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असुन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणार असल्याचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सांगितले 

या घटनेची माहीत समजताच आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने करंजी, पढेगाव शिवारात जावून झालेल्या नुकसानीची पहाणी  करुन संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचेना देत नुकसानग्रस्त नागरीक, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासह तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. जखम झालेल्या महीलांची चौकशी करुन अर्थीक मदत करण्याचे आश्वासन दिले. 

 कोपरगाव तालुक्यात  पढेगाव व करंजी या दोन गावांच्या शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला माञ पुढे शिरसगाव व इतर गावांमध्ये थोडा वारा आला पण पावसाचा एक थेंब पडला नसल्याने निसर्गाची कमाल वाटते.