बालसंस्कार शिबीरे भविष्यकाळाची गरज  – डॉ. क्षितीज घुले

शेवगांव प्रतिनिधी, दि. १९ : ग्रामीण भागात बालसंस्कार शिबीरे ही भविष्यकाळाची गरज असुन त्यामुळे अध्यात्माबरोबर बौध्दिक विकास होतो त्यासाठी दरवर्षी अशी बालसंस्कार शिबीरे राबवली गेली तर त्यांचा बालवयातील विद्यार्थांच्या मनावर चांगले संस्कार होण्यास मदत मिळते हभप आदिनाथ महाराज खोसे यांनी निद्रिस्त गणपतीच्या पावनभुमीत सुरू केलेले बालसंस्कार शिबीर निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी  केले.

 आव्हाणे निद्रिस्त गणपती मंदीर येथे हरीभक्त पारायण आदिनाथ महाराज खोसे यांच्यावतीने ४५ बालकांचे १२ दिवसांचे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या समारोप प्रसंगी घुले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत राम महाराज झिंजुर्के होते.

यावेळी महंत राम महाराज झिंजुर्के म्हणाले, सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असुन सध्याचे आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडत आहेत. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यात्माबरोबर जुन्या आचार विचारांची सांगड घालण्याची गरज असुन तेव्हाच चांगली संस्कारक्षम पिढी घडु शकते.

ग्रामीण भागात खोसे महाराजांनी सुरू केलेल्या बाल सुसंस्कार शिबीरातुन या बालवयातच धार्मिकतेची गोडी या बाल मनावर होऊन देशाचे चांगले सुजान नागरीक घडण्यासाठी निश्चित मदत होईल व दरवर्षी बालसंस्कार शिबीर घेण्यात यावेत व प्रत्येक आई वडीलांनी आपल्या मुलांला शालेय शिक्षणाबरोबरच बालसंस्कार शिबीरात पाठविवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी हभप निलेश महाराज वाणी, हभप शेखर महाराज मुरदारे, संजय कोळगे, कचरू चोथे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, बाळासाहेब कोळगे, डॉ सुधाकर लांडे, सुभाष दिवटे, वसंत गि-हे , रामदास कोळगे, अशोक कोळगे, डॉ. नामदेव दौंड,हभप प्रतिक महाराज आढाव, हभप प्रविण महाराज आन्जान, दिनकर खोसे, विष्णुपंत खोसे, शामराव खोसे, भालचंद्र  पाटेकर, सुरेश ऊकिडे, गणपती देवस्थानचे सचिव लक्ष्मण मुटकुळे, विजय खोसे, नानासाहेब चेडे, दत्तात्रय डुरे आदिंसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काकासाहेब पाटेकर यांनी केले. तर निद्रिस्त गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष मालोजीराव भुसारी यांनी आभारमानले.