विविध क्षेत्रात चमकणाऱ्या भुमिपुत्रांचा सन्मान
शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : तालुकयातील कांबी गावातील विविध क्षेत्रात नैपुन्य मिळवून स्वतः सह सर्वांचेच नाव उज्वल करणाऱ्या भुमिपुत्रांचा रविवारी कांबीकरांनी हृद्य सन्मान केला. नगर, बिड व संभाजीनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील कांबी हे गाव येथील भुमिपुत्राच्या कर्तृवाने अनेक वेळा राज्याच्या नकाशावर झळकले आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांच गावच्या. येथील माध्यमिक विद्यालयात विद्यादानाचे काम करत असतांना थेट भारतीय प्रशासकीय सेवेत जावून संभाजी नगरचे विभागिय आयुक्त व शिक्षण सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कतृत्वाने कांबी गांव प्रकाश झोतात आले.
त्यांचा आदर्श समोर ठेवून भागवत डूकरे, हरिव्दार म्हस्के, प्राजक्त पिसे, यांनी वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस ला प्रवेश मिळवला तर धनश्री राजपुत, गौरव राजपुत, चंचल जाधव, वैशाली थोरात ,स्नेहल खोसे, दत्तात्रय होटकर, वैभव म्हस्को, अंकिता म्हस्क , दिगांबर म्हस्के, यांनी बीएएमएसला प्रवेश मिळवला ॲड. अर्चना राजपुत, ॲड. अजित चोरमले, गणेश डमाळे, कृष्णा थोरात, महादेव गोयकर, सचिन गावड यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे तर प्रांजल म्हस्के यांनी सीबीएससी ला ९७.४ टक्के गुण मिळवले.
त्यामुळे या सगळया गुणवंताचा गुणगौरव समारंभ आयोजित करून ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. गुणवंतांच्या पाठीवर शाबसकीची थाप टाकुन त्यांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी उर्जा दिली. यापुर्वी येथील शेतकऱ्यांना राहुरी कृषी विद्यापीठ तसेच जिल्हा परीषद स्तरावर कृषिभूषण : आदर्श शेतकरी असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.त्याचप्रमाणे अध्यात्मिक क्षेत्रात देखील बोरकर महाराज यांना ज्ञानेश्वरी कंठस्त पाठ असल्याने मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.पन्हाळकर महाराज यांना तर झी टिव्ही ने खास सदस्य बनवून घेतले आहे.
हा सन्मान समारंभ जेष्ट नेते पंजाबराव पारनेरे यांच्या अध्यक्षते खाली सरपंच नितीश पारनेरे, उपससंच सुनिल रजपुत, डॉ. अरुण भिसे, डॉ. प्रमोद जाधव, डॉ. दिपक जैन, डॉ. सतिष मनचुके, डॉ. निखिल जगताप, डॉ. धारकर, यांच्या सह ग्रामस्थ व विदयार्थ्याचा उपस्थिती संपन्न झाला.