राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमात ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव 

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव ३ जुलै रोजी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यांत आला असून त्यानिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रम होत असल्याची माहिती श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज व अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली.

होळकर म्हणाले की, सदर दिवशी पहाटे चार वाजता बाबाजींची महापुजा, ५ ते ६ नित्यनियम विधी, सकाळी ७ ते ८ सत्संग व प्रवचन, बाबाजींची षोडशोपचार पूजा ९ ते १०. विविध साधु संतांची प्रवचने व दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे (त्रंबकेश्वर), अनंत लावर गुरूजी (राहाता), जयप्रकाश पांडे हे करणार आहेत. 

 या गुरूपौर्णिमा उत्सवासाठी प पू. मधुगिरी, माधवगिरी, रमेशगिरी, दत्तगिरी, ज्ञानगिरी, परशरामगिरी, भोलेगिरी, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी, गुलाबगिरी, सुदामगिरी, संदिपगिरी, संतोषगिरी, शिवभक्त भाउ पाटील, यांच्यासह सर्व संत महंत मोठया संख्येने उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळयासाठी मोठया संख्येने उपस्थित राहुन तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन आश्रमाच्यावतीने उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अत्रे, विश्वस्थ बक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदिप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे यांनी केले आहे.

नगर मनमाड महामार्गावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम असुन देश विदेशातील भक्त येथे भेट देवुन दर्शन घेतात पंचधातुपासून जनार्दन स्वामींची सर्वांग सुंदर मुर्ती तयार करण्यांत आली आहे. या सोहळयाची तयारी सुरू झाली असून मंदिर कळसावर विद्युत रोषणाईचे काम चालु आहे.  महाप्रसादात आमटी भाकरी वाटण्यात येते.