समताच्या इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के – स्वाती कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. इ.१२ वी विज्ञान शाखेचा २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.१० वीची उज्वल निकालाची परंपरा कायम राखत सीबीएसई इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या ही वर्षी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी दिली.

समता इंटरनॅशनल स्कूलचे इ.१२ वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून सुजल फुलसुंदर याने ९७.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. मानसी वाकडे हिला ९०.४ टक्के तर खुशी कोठारी हिला ८६ टक्के गुण मिळाले असून यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.सर्वेश कांगणे याने ८५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.

गायत्री देठे, अवनी कुलकर्णी, रोधा काळे, क्रिशना काळे, समृद्धी भुसारे, मृदुला सोनकुसळे, आशिष पानसरे, राजहंस आढाव, प्रेरणा सदाफळ, प्रतीक साळुंखे, तनिष्का औताडे, रूद्रा काले, शाश्वत सोनकुसळे, अंकुर कुकरेजा आदी विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सौ. हर्षालता शर्मा, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.