‘आठवणीतील शेवगाव’ हा ग्रंथ म्हणजे प्रति वास्तविक इतिहास – डॉ. सदानंद मोरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० :  शेवगावच्या सिद्धहस्त लेखिका डॉ. मेधा कांबळे यांनी ‘आठवणीतील शेवगाव ‘या ग्रंथातून शेवगाव परिसराचा इतिहास जागविण्याचा केलेला प्रयत्न निश्चीत गौरवास्पद आहे . हा ग्रंथ म्हणजे प्रति वास्तविक इतिहास ( काऊंटर फॅक्च्युअल हिस्ट्री ) या नविन प्रकाराची अनुभूती आहे. असे प्रतिपादन राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ सदानंद मोरे यांनी केले.

येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा कांबळे यांनी लिहिलेल्या ‘ आठवणीतील शेवगाव ‘ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा  प्रा .डॉ . मोरे यांचे अध्यक्षतेखाली शेवगावचे भूमिपुत्र सेवानिवृत्त शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे हस्ते प्रसिद्ध कवि व समिक्षक डॉ कैलास दौंड,  जि .प .च्या माजी अध्यक्षा सौ राजश्री घुले,  माजी जीपसदस्या हर्षदा काकडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य डॉ पुरुषोत्तम कुंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी ते  बोलत होते.

    प्रा .डॉ . मोरे यांनी लेखिकेने या ग्रंथाच्या माध्यमातून मातृभूमिचे ऋण फेडले असल्याचे नमुद  केले. तर डॉ. भापकर यांनी इतिहास लेखन सोपे नसते. त्याला कल्पनेची जोड देता येत नाही. प्रत्येक घटना त्यातील संदर्भ पडताळून पहावे लागतात. लेखिका डॉ. कांबळे यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. अशा शब्दात गौरव करून हा ग्रंथ परिसरातील सर्वांना प्रेरणा दायक ठरेल अशा शुभेच्छा दिल्या.

      लेखिका डॉ. कांबळे म्हणाल्या कीं, प्रत्येक गावचा एक इतिहास असतो. शेवगाव शहरातील गेल्या शंभर वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदि विविध क्षेत्रातील सर्वांगीण  विकास व बदल तसेच विविध मान्यवरांच्या कामगिरीची  माहिती घेऊन तालुक्यातील ज्येष्ठासह आजच्या युवकांना ग्रथातून परिपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे स्पष्ट करून त्यासाठी दोन वर्षे अनेकांकडून अविरत माहिती व संदर्भ संकलित करुन  ‘आठवणीतील शेवगाव ‘या ग्रंथाला आकार दिल्याचे नमुद केले.

  यावेळी सौ.सुरेखा मोरे, माजी जि. प. सदस्य योगिता राजळे, श्रीरामपूरच्या माजी सभापती सुनिता गायकवाड, शिवशांकर राजळे, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, पद्मा पाठक, ॲड. सुभाष लांडे, युवराज नरवडे, श्रीहरि वारकरी, संजय फडके, डॉ. भाऊसाहेब लांडे पाटील, श्रीमंत घुले, प्रकाशक लक्ष्मण झिंजुर्के, डॉ अशोक देशमुख, ॲड. कारभारी गलांडे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, डॉ बहाउद्दीन काझी, वजीर पठाण, शब्बीर शेख, प्रा. परशुराम गणगे, हरिश्चंद्र नजन यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  अरिस्टंट कमांडन्ट नरेंद्र गच्ची यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा विजया मते यांनी सुत्रसंचलन केले. दीक्षा गच्ची यांनी आभार मानले.