शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१ टक्के तर कला शाखेचा निकाल ८२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत राधिका अंचवले ८९ ३३ गुण(प्रथम) सुमित चव्हाण ८३ .५०( द्वितीय) तर वाळुंजकर समृद्धी ८२ .८३( तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
कला शाखेत अथर्व काळे ७६ .८३ गुण(प्रथम) प्रियांका सुपारे ७६ . ३३ ( द्वितीय) तर पटेल फिरदोस ७३ ३३( तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले तर वाणिज्य शाखेत साक्षी काथवटे ८७ ३३(प्रथम) महेश कातकडे ८२ १६( द्वितीय) तर जान्हवी डहाळे ७६.१६( तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, उपसचिव हरीश भारदे प्राचार्य शिवदास सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.