चापडगाव ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेचा निकाल 98.83%

कला शाखेचा निकाल 87.93%

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांचे वतीने  फेब्रु / मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या  चापडगाव ज्युनि कॉलेजच्या  इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचा 98.83%  निकाल लागला असून. मडके ज्ञानेश्वरी नारायण- प्रथम (85.33% )
पावसे प्रतिक्षा नारायण . द्वितीय ( 85. 33% ),   कणसे आरती नवनाथ –  तृतिय (84.33%, ), तर शिंदे साक्षी विजय – चतूर्थ (83.67% ‘
विज्ञान शाखेत  53 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह  तर 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेचा निकाल 87.93% लागला असून  बडे गीता महादेव – प्रथम (89.50%, भवर जयश्री अशोक- द्वितीय (83.00%) तर डोंगरे भक्ती मच्छिंद्र – तृतिय (82.50% ) उत्कृष्ठ निकालाबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहचे अध्यक्ष ॲड डॉ. शिवाजीराव काकडे, जि.प सदस्या हर्षदा काकडे, विश्वस्त  पृथ्वीसिंह विद्याधर काकडे , विद्यालयाचे प्राचार्य  अरुण वावरे,  उपमुख्याध्यापक भाऊसाहेब टाकळकर, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.