रेसिडेन्सीयलची अकोलकर तालुक्यात अव्वल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : येथील रेसिडेन्सीअल  माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99. 64% टक्के लागल्याची माहिती प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी दिली विद्यालयाची पूजा अकोलकर ही विद्यार्थिनी 92.17% गुण मिळवून तालुक्यात सर्वप्रथम आली आहे. विद्यालयातून विज्ञान शाखेतून 278 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 65विद्यार्थी विशेष श्रेणी तून 177 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून तर 36 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहे .

       द्वितीय -ऋषिकेश विष्णू झिरपे (89.17% ) तृतिय – वैष्णवी विठ्ठल घनवट (87.50% ) चतूर्थ श्रीकांत अरुण ताठे ( 87.17% ‘ )  भूमी महेश गांधी ( ८६.८३ टक्के ) सुदर्शन राजेंद्र नाटकर (८६.५० टक्के )गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे .संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दारे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर प्राचार्य गायकवाड पर्यवेक्षक देविदास सोनटक्के उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले