मराठी माध्यमाचा ९१•१५% निकाल तर सेमी माध्यमाचा ९९•१३ %
शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : काकडे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वीच्या निकालात उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयातील २२९ विद्यार्थी’ विशेष प्राविण्य’ श्रेणीमध्ये १०१ विद्यार्थी प्रथम’ श्रेणीमध्ये तर ३२ विद्यार्थी ‘द्वितीय श्रेणीमध्ये तर एक विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल ९६.२८% लागला आहे.
मराठी माध्यमाचा शेकडा निकाल ९१•१५ % लागला असून सोफिया शेख- ८८.४०%(प्रथम ) ‘ऋतुजा निकम-,८६.४०%(द्वितीय) तर
सिद्धी भोसले-,८६.२०(तृतीय) आल्या.
सेमी माध्यमाचा शेकडा निकाल ९९•१३ % लागला असून त्यात गायत्री गिऱ्हे ९८.००%(प्रथम) हर्षदा सातपुते ९७.६०% व अथर्व देशमुख ९७.६०%( दोघे द्वितीय) तर प्रणव दौंड-९७.००%(तृतीय) आला संस्कृत विषयामध्ये जयदीप वावरे या विद्यार्थ्याने १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अध्यक्ष ॲड.डॉ. विद्याधर काकडे, माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अभिनंदन केले.